
म्हसवड वार्ताहर
माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे नुकतेच महायुती सरकार मधील केंद्रीय मंत्री म्हणून दहिवडी येथे परतत आहेत.
त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून दहिवडी येथे त्यांच्या आगमनासाठी उद्या दिनांक 23 रोजी माण तालुका सज्ज झालेला आहे.
दहिवडी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती इंजिनिअर सुनील पोरे यांनी दिलेली आहे.
नागपूर येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपून आमदार जयकुमार गोरे हे प्रथम सातारा जिल्ह्यात येत आहेत .
सोमवारी सकाळी आठ वाजता पुणे इथून ते निघणार आहेत .त्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे सकाळी दहा वाजता त्यांचें आगमन होणार असून त्यानंतर साडेदहा वाजता नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिस्थळावर अभिवादन करणार आहेत.
अकरा वाजता खंडाळ्यात स्वागत समारंभ व साडेअकरा वाजता कवठे किसनवीर आबा यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. दुपारी बारा वाजता वाढे फाटा येथे नाक्यावर येणार आहेत.
तेथे शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
त्यानंतर दुपारी एक वाजता कोरेगाव ,दुपारी दोन वाजता पुसेगाव व अडीच वाजता पांढरवाडी दुपारी 1- 45 वाजता महिमानगड दुपारी तीन वाजता पिंगळी येथे स्वागत होणार आहे.
तर सायंकाळी चार वाजता दहिवडी येथे आगमन होणार असून स्वागत करण्यासाठी दहिवडी नगरी सज्ज झालेली आहे .
दहिवडी येथील रिलायन्स पेट्रोल पंप, एसटी स्टँडच्या मार्गे फलटण चौक व सिद्धनाथ मंदिर अशी मिरवणूक भव्य प्रमाणात करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे.