सौ माधुरी शिंदे-जाधव यांना प्राइड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

Spread the love

फलटण वार्ताहर ..

शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरी व अतुलनीय योगदानाबद्दल सौ माधुरी शिंदे-जाधव यांना प्राइड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्कार महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

प्राइड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड राज्य स्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत पद्म भास्कर डाॅक्टर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्र्वर महाराज होते.

जिल्हा परिषद शाळा उंब्रज ( मुले) येथील उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका सौ माधुरी शिंदे-जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत लेखन, वाचन, अंक ज्ञान, इंग्रजी भाषा विकास ज्ञानरचनावाद, कृति युक्त शिक्षण, आनंददायी शिक्षण, शैक्षणिक कृती संशोधन,कला क्रीडा सांस्कृतिक साहित्य वैज्ञानिक विषयावर केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी प्राइड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदरचा मानाचा राज्य स्तरीय प्राईड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्कार महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभहस्ते ‌शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, गौरव चिन्ह देऊन दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध पाश्वगायिका कविता राम,सिने सृष्टीतील अभिनेता पंकज काळे, विठ्ठल डाकवे,सौ माई साळुंखे,डाॅक्टर संदीप डाकवे,सौ रेश्मा डाकवे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संदीप डाकवे यांनी केले तर सुत्रसंचलन रेश्मा डाकवे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी संघटना प्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ माधुरी शिंदे-जाधव यांना प्राइड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री ना शंभुराजे देसाई,खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले,माजी आमदार बाळासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे शिक्षण विस्तार अधिकारी समंत्ती देशमाने, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील, उंब्रज ग्रामपंचायत सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदाताई जाधव मुख्याध्यापक पद्मा चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक माने,सौ मनिषा मोहिते, अनिलकुमार कदम ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!