आने वाडी भैरवनाथ यात्रा 30 पासून सुरू

Spread the love

आनेवाडीच्या पाडव्याच्या यात्रेचा दिनांक ३० मार्च पासून आरंभ

(अजित जगताप)
आनेवाडी दि: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी येथील पाडव्याच्या बाजार तथा श्री भैरवनाथ देवाची यात्रा रविवार दिनांक ३० मार्चपासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत आहे. यात्रेची संपूर्ण तयारी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे.
जावळी तालुक्यातील मेढा येथील वार्षिक बाजार नंतर व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांना आणेवाडीच्या पाडव्याच्या बाजाराला जाण्याची घाई होते. पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन नव्हते .त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आनेवाडीचा बैल बाजार दहा दिवस चालत होता.
खर्शी तर्फ कुडाळ व विरमाडे हद्दीपर्यंत आनेवाडी च्या बाजारचा पसारा मांडला जात होता. दहा दिवस जातीवंत बैलांची खरेदी विक्री तसेच मनोरंजनासाठी नामांकित तमाशाचे फड आनेवाडी च्या बाजारला आवर्जून येत होते. आजही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. आनेवाडी च्या बाजारासाठी कर्नाटक, कोकण, रायगड ,ठाणे मुंबई, पनवेल एवढेच नव्हे तर सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील बैलाचे व्यापारी येत होते. आजही अनेक व्यापारी आनेवाडीला दाखल झालेले आहेत.
आनेवाडी च्या वार्षिक यात्रेनिमित्त रविवारी सहा एप्रिल रोजी श्री ची मिरवणूक व छबिना सायंकाळी आणि सोमवारी सात एप्रिल रोजी बैलगाड्यांच्या भव्य जंगी शर्यती आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मंगळवार ८ एप्रिल रोजी शिळी यात्रा असून रात्री नऊ वाजता गाजलेला छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे . आनेवाडीच्या वार्षिक यात्रेनिमित्त आनेवाडी परिसरात विविध भागातून मूळ ग्रामस्थ यात्रेसाठी आले असल्याने परिसर गजबजून गेलेला आहे.


फोटो- आनेवाडी ता. जावळी येथील वार्षिक बाजार साठी आलेले शेतकरी व बैल जोडी (छाया- अजित जगताप सायगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!