वडूजच्या नगराध्यक्ष पदी सौ रेश्मा बनसोडे यांची नियुक्ती

वडूज :प्रतिनिधी-विनोद लोहार
वडूज नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षा मनिषा रविंद्र काळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सर्वसाधारण महिला आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी स्वप्नाली गणेश गोडसे व रेश्मा श्रीकांत बनसोडे असे दोन अर्ज दाखल झाले होते.मात्र बर्याच नाट्यमय घडामोडींनंतर स्वप्नाली गोडसे यांनी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्षा पदी रेश्मा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, प्रभारी मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्यासह अंकुश गोरे, भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती.
भाजपा सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित कालखंडासाठी नगराध्यक्षा पदी प्रथम सहा महिन्यांसाठी रेश्मा बनसोडे, तदनंतर सात महिन्यांकरिता स्वप्नाली गोडसे व त्यानंतर रेखा माळी असा समझोता समोर आला आहे.
नगराध्यक्षा पदासाठी दोन पैकी एक अर्ज माघारी घेतल्याने रेश्मा बनसोडे यांंचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने आज शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषपूर्ण वातावरणात गुलालाची उदाहरणं केली त्यानंतर नूतनगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे यांची शहरातून उत्साह पूर्ण वातावरणात शहरातून मिरवणूक काढण्यात आले.
फोटो: रेश्मा बनसोडे