बाणूरगड येथे बहिर्जी नाईक श्रावणधारा साहित्य संमेलनाचे आयोजन .

Spread the love

म्हसवड वार्ताहर

बाणूरगड येथे सोमवारी १८ ऑगस्ट रोजी बहिर्जी नाईक श्रावणधारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
आटपाडी तालुका साहित्य मंच , खानापूर तालुका साहित्य परिषद , जिल्हा परिषद शाळा बाणूरगड व बाणूरगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन होणार आहे . या संमेलनाच्या अध्यक्षपदी खानापूर विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . संताजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे . कवीसंमेलनाध्यक्षपदी प्रा . डॉ अरुण कांबळे बनपुरीकर आहेत . आटपाडी तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत .
बाणूरगड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शारदाताई सज्जन बाबर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन सकाळी साडे दहा वाजता होणार आहे . पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषणासहीत साहित्यिक विचारांची मेजवानी असणार आहे . दुसऱ्या सत्रात प्रतिथयश कवी तसेच विद्यार्थी व शिक्षक कवींचे कवीसंमेलन होणार आहे . पोवाडा व कवितांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचे गुणगान गायले जाणार आहे .
या संमेलनासाठी सुप्रसिद्ध कथाकथनकार व बाणूरगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जीवन सावंत , गझलकार सुधाकर इनामदार , बाणूरगडचे सज्जन बाबर व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत .
खानापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव सराटे, शिक्षणविस्तार अधिकारी विकास राजे , दत्तात्रय मोरे , केंद्रप्रमुख सुरेश मंडले, उपसरपंच शिवभूषण गायकवाड , जेष्ठ साहित्यकार रघुराज मेटकरी, ॲडव्होकेट सुभाषबापू पाटील , कथाकथनकार प्रा . विश्वनाथ गायकवाड , प्रा . साहेबराव चवरे ‘ समिक्षक डॉ . सयाजीराजे मोकाशी, जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे , शिवाजी बंडगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गायकवाड , बाणूरगडचे पोलीस पाटील किरण ऐवळे यांची संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे . युवावक्त्या डॉ . सुप्रिया साळुंखे कदम ह्या संमेलनातील कार्यक्रमांचे सूत्रसंचलन करणार आहेत . विद्यार्थी , शिक्षक व साहित्यप्रेमी नागरिकांनी संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!