दहिवडी वार्ताहर —
राणंद, ता. माण गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. जमीनी च्या वादातून वृध्द महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संगिता खाशाबा कोळेकर यांनी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरी आढळून न आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना रात्री साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असता, मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर राणंद गावात एकच खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातूनच ठाण्याला कळवले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पाटील
त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूर येथील मोहन हांगे, नंदकुमार खाडे, नितीन लोखंडे, महेंद्र खाडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
हिराबाई यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
राणंदः घटनास्थळी चौकशी करताना म्हसवड पोलीस अधिकारी.