रोहतवाडी येथे सावंत परिवारातर्फे सार्वजनिक जागरण गोंधळ आणि गोंधळी पार्टी यांचा मेळावा

Spread the love

आपल्या बातम्या जाहिरातीसाठी संपर्क संपादक Vijay Takane Mb-9921494998

*पाटोदा- (प्रतिनिधी)रोहतवाडी येथे सावंत परिवारातर्फे सार्वजनिक जागरण गोंधळ आणि गोंधळी पार्टी यांचा मेळावा सादर* तालुका पाटोदा येथील रोहतवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील जागरण गोंधळ पार्टी यांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक पार्ट्या दरवर्षी येत असतात याही वर्षी आल्या होत्या संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत संबळ तून-तुण्याच्या गजरात देवीचा आरतखाना काढण्यात आला होता नंतर परड्या भरून गावातील व आलेल्या पाहुण्यांना महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच आठ ते नऊ वाजेपर्यंत आराधीमेळा यांचे आराधी गीते सादर करण्यात आली.नंतर मेळाव्याला सुरुवात झाली सर्वप्रथम भैरवनाथ ज्योतिबा आणि सिद्धनाथ यांच्या भराडाचा कार्यक्रम मच्छिंद्र सावंत शिऊर ता. जामखेड यांनी केला. येडूच द्वार मल्हार सरकार जागरण गोंधळ पार्टी काळेगाव ता. हवेली यांनी खंडेरायाचे जागरणाला सुरुवात केली. नंतर रात्रभर बीड धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर पुणे येथून आलेल्या तसेच धनगर जवळका बाबुळगाव दासखेड येथील पार्ट्यांचा कार्यक्रम रात्रभर चालू होता या मेळावाचे आकर्षण महाराष्ट्रात संबळ सम्राट असणारा कलाकार काळु( कृष्णा ) शिंदे यांचे जबरदस्त संबळ वादन ऐकायला मिळाले हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सावंत परिवारांनी अतिशय मेहनत घेतली व कार्यक्रम पार पाडला त्यामुळे ग्रामस्थांनी या परिवाराचे कौतुक केले हा कार्यक्रम श्री संजय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावंत परिवारातील ज्येष्ठ कनिष्ठ वृद्ध तरुण युवकांनी पार पाडला तसेच या कार्यक्रमाचा लाभ रोहतवाडी परिसरातील रसिक श्रोत्यांनी रात्रभर घेतला. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पार्ट्यांचे आभार सावंत परिवारांनी मानले व सकाळी महाआरतीने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

🚨 माणदेशी न्यूज. संपादक विजय टाकणे. पाटील. 9921494998. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!