वावरहिरे येथे १९ ते २२ सप्टेंबरला श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांचा ६४ वा पुण्यतिथी महोत्सव
नवचंडी यज्ञ, कीर्तन, भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम
म्हसवड (वार्ताहर)-
वावरहिरे (ता. माण, जि. सातारा) – वावरहिरे येथील श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज संस्थानतर्फे पूज्यपाद ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांचा ६४ वा पुण्यतिथी महोत्सव व नवचंडी यज्ञ सोहळा १९ ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.
पहिल्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी, कलश स्थापना, गणेश पूजन व महाराजांच्या मूर्तीचे पूजन होईल. यानंतर संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. पुढील दिवसांत वेदमंत्र पठण, अभिषेक, हवन, भजन, प्रवचन व नवचंडी यज्ञ अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
२२ सप्टेंबर रोजी सकाळी पूजन व महाआरतीनंतर महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल.
दुपारी 2 /३५ वाजता गुलाल कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन संस्थानचे अध्यक्ष श्री. शिवदत्त हनुमंतमहाराज कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. कल्याण हनुमंतमहाराज कुलकर्णी तसेच सर्व भक्तवर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
