सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनधारक त्रस्त

Spread the love

पिपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/ अभिजीत लेभे

सीएनजीच्या आपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनधारक गॅसवर असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यामुळे दिसत आहेत.

पेट्रोल डिझेल वरील वाहनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने सीएनजी पंप सुरू केले आहेत. सीएनजी वर वाहनांची निर्मिती आणि विक्री करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे परंतु सीएनजींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मूळ उद्देश साध्य होत नसल्यामुळे वाहनधारकाची तक्रार आहे. एन उन्हाळ्यात सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा तासांतच लागत आहेत. मोजक्याच पंपावर सीएनजी चा पुरवठा होत आहे तो देखील अपुरा होत असल्याने ग्रामीण भागातील सीएनजी वाहनधारक वैतागले आहेत.

सर्व कामधंदे सोडून सीएनजी पंप शोधण्याचा उद्योग करावा लागत असल्याने वाहन धारक बोलत आहेत .
अनेकांनी व्यवसाय यासाठी सीएनजी वर चालणारी वाहन खरेदी केली आहेत त्यांना सीएनजी साठी रांगेतू थांबावे लागत आहे किंवा पंपावर सीएनजीचा पुरवठा होण्याची वाट पहावी लागत आहे .त्यामुळे अनेकांनी वैतागून वाहने विकली आहेत पंपावर रांगेत थांबून देखील सीएनजी मिळेल याची शाश्वत नाही कारण पंपावरील सीएनजी कधी संपेल परत कधी मिळेल याचा नेम नाही मोठ्या शहरांमधील पंपांना पाईपलाईन द्वारे सीएनजी पुरवठा होतो परंतु ग्रामीण भागात वेगळे चित्र आहे सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात सीएनजीचा अधिकचा पुरवठा व्हावा अशी वांधारकांची अपेक्षा आहे शासनाने सीएनजीच्या पुरवठा सुरळीत केल्या समस्या निकाली निघतील इतर इंधनाच्या तुलनेने सीएनजींच्या किमती कमी करण्यात आणि राज्यांमध्ये समान दर लागू करावेत अशी मागणी होत आहे.
पेट्रोल डिझेल प्रमाणे प्रत्येक पंपावर सीएनजी देखील उपलब्ध करून द्यायला हवा अशी अपेक्षा वाहनधारक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!