
डिजिटल मिडिया साठी जाहिरात देण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सलग्न मराठी डिजिटल मिडिया पत्रकार परिषद यांच्या मार्फत करण्यात आली होती, या मागणीच्या पाठपूराव्याला यश आले असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालक यांनी डिजिटल मिडिया ला जाहिरात देण्यात बाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
म्हसवड (वार्ताहर)—पत्रकारांसाठी आनंदाची बातमी ,आता डिजिटल मिडिया ला शासन जाहिराती देणार.
शासन निर्णय,
शासनाने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला असून आगामी काळात फेसबुक,युट्युब,इंस्टाग्राम या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद डिजिटल मीडियासाठी जाहिराती सुरू कराव्यात यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुराव्याला यश आल आहे.
अशी माहिती सातारा जिल्हा डिजिटल मिडिया पत्रकार परिषद चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.