(अजित जगताप)
सातारा दि:
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना यांची
राज्यस्तरीय कार्यकारणी विशेष सभा रविवारी दि:१५ जुन२०२५ रोजी सकाळी ११ वाजता सातारा
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सातारा जिल्हा
परिषदे अंतर्गत प्रथमच आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

सदरच्या विशेष कार्यकारिणी सभेसाठी राज्य लेखा संघटनेचे राज्याध्यक्ष श्री मिलींद कांबळे, कार्याध्यक्ष श्री. संजय महाळंकर,
कार्याध्यक्ष श्री. महेश कोत्तावार, कोषाध्यक्ष श्री चंद्रशेखर फसाळे,
सरचिटणीस श्री प्रशांत सुतार, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेचे लेखा संघटनेचे माननीय पदाधिकारी, सदस्य, तसेच लेखा बांधव यांची उपस्थिती असणार आहे.
सदरच्या सभेमध्ये १०,२०,३० वर्ष कालबद्ध पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना.सहाय्यक लेखा अधिकारी परीक्षा रद्द करणे. डी. एम. आर. इ. जी. एस.
अतिरिक्त कामकाज कमी करणे.
सहाय्यक लेखाधिकारी मधून लेखाधिकारी पदोन्नती बाबत. सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी बाबत चर्चा करणे. नागपूर खंडपीठाकडे कोर्ट केस बाबत चर्चा करणे. मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी पाठपुरा समिती गठीत करणे.
माननीय अध्यक्ष यांच्या मान्यतेने येणारे इतर विषयाबाबत चर्चा होणार आहे. सदरच्या संपुर्ण विशेष सभेचे नियोजन सातारा जिल्हा परिषद लेखा
कर्मचारी संघटनेच्या वतीने करणेत येणार आहे . विशेष सभेची संपूर्ण जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ काटकर,
उपाध्यक्ष श्री. प्रविण गंगावणे, उपाध्यक्ष श्री. संतोष शिंदे व सचिव श्री. विजय
कुंभार, कार्याध्यक्ष श्री. सुनिल पवार, राज्य प्रतिनिधी श्री. रविंद्र बोरकर, व
कोषाध्यक्ष श्री. सावता गायकवाड यांनी दिली आहे.