
मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यात प्रतिष्ठित असणाऱ्या जयराम स्वामी विद्या मंदिर येथील
दिनांक 10 जानेवारी व 11 जानेवारी 2025 रोजी यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव च्या सीनियर गटातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला . या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांमधून अनेक संघांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
सीनियर गटामध्ये
- अवधूत विजय सपकाळ
- ध्रुव मकरंद तडसरे
- आयुष रामचंद्र राऊत
या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
तसेच मिडल गटामध्ये - सिद्धेश दत्तात्रय मगर
- रुद्र संजय होनराव
- रुद्र विजय सुतार
या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या विद्यार्थ्याना अटल विभाग प्रमुख श्री.एस.टी. घार्गे व श्री. एम.एन. घार्गे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹