
मायणी प्रतिनिधी
मायणी परिसर पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे भाऊ यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मायणी पोलीस स्टेशन होण्याबाबत चर्चा झाली. तसेच मायणी पक्षी संवर्धन आरखडा निधी बाबत चर्चा झाली. याबाबत भाऊंनी सविस्तर चर्चा करून लवकरच संबंधित विभागामार्फत वरील प्रश्न सोडवू असे सांगितले. यावेळी समवेत मायणी परिसर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संदीप कुंभार,पत्रकार सतीश डोंगरे,विशाल चव्हाण, अमोल भिसे उपस्थित होते.
यानिमित्ताने मंत्री पद मिळाले बद्दल जयकुमार गोरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच मायणी परिसर पत्रकार संघ.नूतन कार्यकारणी पदाधिकारी यांना नामदार जयकुमार गोरे यांनी शुभेच्छा देताना आपण सदैव पत्रकारांच्या सोबत असल्याचं सांगितले.