
औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
औंध बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुख्य रोखपाल म्हणून कार्यरत असलेले चेतन धोत्रे यांनी उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वर्ग एकच्या अधिकारीपदी यशस्वीरित्या गवसनी घातली आहे. त्यांच्या या पदोन्नतीने संपूर्ण औंध गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
बँकेचे शाखाधिकारी संदीप कुमार आणि उपशाखा अधिकारी निल शिंदे यांनी त्यांचे विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच औंध येथील माजी उपसरपंच दीपक नलवडे, गणेश देशमुख, गणेश हरिदास आणि तानाजी इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन चेतन धोत्रे यांचा गौरव केला.
या प्रसंगी बोलताना उपस्थितांनी धोत्रे यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले. त्यांनी दिलेल्या आर्थिक सेवेमुळे अनेक ग्राहकांचे विश्वासार्ह संबंध बँकेशी निर्माण झाले आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.
पदोन्नतीनंतर चेतन धोत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “ही पदोन्नती माझ्या कर्तव्यनिष्ठेची पावती आहे. मला मिळालेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत राहीन व समाजाचा विश्वास कायम राखेन.”
गावकऱ्यांच्या शुभेच्छांनी भारावलेल्या चेतन धोत्रे यांची ही यशस्वी वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.