म्हसवड /प्रतिनिधी –

म्हसवड शरहातील मोफत नगर वाचनालय मध्ये प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था या ठिकाणी ३०-३५ क्योवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत अटल बयो अभ्युदय योजनेबद्दल कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिंसा सहकारी पतसंथा चे चेरमन आणि मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष नितीन दोषी हे उपस्थित होते. त्यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेली माहिती गरजूपर्यंत पोहचवली तर त्याचा खच्या अर्थाने उपयोग आहे, असे सांगितले. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा’ या अभियानंतर्गत अटल वयो अभ्युदय योजने बद्दल जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. सामुदायिक रेडियो संघटना,माणदेशी रेडिओ ९०.४ एफ. एम.च्या माध्यमातून पुढील १ महीने ही जनजागृती करण्यात येणार असून अटल वयो अभ्युदय योजने सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे माणदेशी रेडिओ ९०.४ एफएमचे केंद्र प्रमुख अनुप गुरव यांनी सांगितले माणदेशी फोंडेशन यांच्या संकल्पनेतून साकार झालेले माणदेशी रेडिओ ९०.४ एफएम जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन वेळोवेळी केले जाते. यावेळी वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या टोल फ्री नंबर १४५६७ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तत्काळ सोडवण्यात येतील तसेच बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी निवेदिका कांचन ढवण आणि माणदेशी टीम यांनी परीक्षम केले .
