
तब्बल ३० वर्षांनी जपले ऋणानुबंध
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील १९९४-९५ बॅचचा स्नेहमेळावा
▲ देवापूर, दि. १७ : कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी तब्बल ३० वर्षांनी ऋनानुबंध जपले. हा स्नेहमेळावा म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… असाच होता.
कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दहावीतील सन १९९४_९५ सालातील वर्ग मित्र-मैत्रिर्णीचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.हा मेळावा 105 विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सध्याचे प्राचार्य तुकाराम माने सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी सर्व शिक्षकांना फेटा ,शाल, स्मृतिचिन्ह व उपस्थितांची फोटो फ्रेम प्रदान करण्यात आली.
तत्कालीन दहावीचे मित्र व मैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यावेळी तब्बल …… जणांनी उपस्थिती लावली. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या
आठवणी जाग्या झाल्या. अनेकांना यावेळी गहिवरून आले.कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून या मेळाव्याच्या चर्चा घडवून हा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या तत्कालीन विद्यार्थी व विद्यार्थिनीनी या स्नेहमेळाव्याचे नेटके आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यासाठी तत्कालीन गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये माजी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक क्लार्क,शिपाई , लॅब असिस्टंट आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अनेक वर्षांनंतर सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व ओळख परेड, तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठक्करबाप्पा वसतिगृहातील चिमुकल्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. माजी विद्यार्थ्यांनी वॉटर अक्वॉ फिल्टर शाळेला प्रदान केले.त्याच बरोबर शाळा परिसरात ठिबक करून वृक्षारोपण करण्यात आले.
मेळाव्याच्यानिमित्ताने आपली मनोगते व्यक्त करताना आमच्या मातृभूमीविषयी व या शाळेविषयी सार्थ अभिमान आहे. येथील विद्यार्थी आणि लोकांनी आम्हाला मानसन्मान दिला. भविष्यकाळात या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्ही सदैव करू अशी ग्वाही उपस्थित शिक्षक मान्यवरांनी दिली. या स्नेहमेळाव्यात शाळा प्रशासनाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास विद्यालयाचे माजी प्राचार्य, मगदूम डी. एन, अजीव सदस्य बनगर एस जी, माजी मुख्या. पवार ए. एन.,(अंबादास), फडतरे सी जी, साठे पी .एन .सर कदम एन. एन., कदम व्ही. एम., उपस्थित होते.
माजी शिक्षक म्हणून निप्रुळ एल.व्ही,प्रा. लेंगरे एस बी,, शिंदे यु. ए. सर उत्तम मोरे सर, वसंत शिरकांडे सर, बुद्रुक सर, कोकाटे सर, सूर्यकांत कांबळे सर , कोडलकर सर, वाघमोडे सर, मदने सर, पिंगळे सर, व लेखनिक शेंडे सर, नरळे सर, इत्यादी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी गेली दोन महिने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
Show quoted text