पळशी हायस्कुलच्या माजी विध्यार्थ्यांचे गेट टूगेदर

Spread the love

पळशी हायस्कुलच्या माजी विध्यार्थ्यांचे गेट टूगेदर
जुन्या आठवणींना उजाळा
मार्डी प्रतिनिधी दि :- १७
रयत शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालय पळशी येथील एसएससी च्या सन १९९७-९८ च्या बॅच चा स्नेह मेळावा दहिवडी येथील चैतन्य अकॅडमी येथे उत्साहात साजरा करण्यात आला . माजी विध्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला . या मेळाव्यात शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला .
चैतन्य अकॅडमी च्या वतीने सुरवातीला सर्वांचे फेटे बांधुन स्वागत करण्यात आले . स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून वर्ग भरला .
गितांजली खाडे यांची वर्गशिक्षक म्हणून निवड झाले नंतर राष्ट्रगीत , प्रार्थना परिपाठ व हजेरी घेण्यात आली . सर्वांची ओळख करून झाले नंतर विविध प्रकारचे मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले .विजेत्यांना वृक्ष देण्यात आले .
पर्यावरण संतुलनासाठी निसर्गरम्य चैतन्य अकॅडमी त वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला .
शाळेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत .नोकरी , उद्योजक व व्यवसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे आहे . सर्वच विध्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेप्रती कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला .
चैतन्य अकॅडमी च्या वतीने संदीप खाडे व सारिका खाडे यांनी सर्वांचे स्वागत शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह महिला भगिनींना साडी चोळी भेट देऊन गौरविण्यात आले .
स्नेहभोजन झाल्यानंतर पुढील वर्षी भेटण्याचा निश्चय करून कार्यक्रम संपन्न झाला .
प्रास्ताविक दत्तकुमार खाडे तर आभार अ‍ॅड हेलन ओंबासे यांनी , मनोगत शशिकांत खाडे यांनी व्यक्त केले .
सूत्रसंचालन आप्पासो गायकवाड यांनी तर फनी गेम मनोरंजनांचे खेळ तुळशीराम यादव यांनी घेतले
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!