
म्हसवड वार्ताहर
आज दिनांक १७.४.२०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी च्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवून लोकांच्या जीवनाचा खेळ मांडणाऱ्या सरकारच्या निषेध अर्थ म्हसवड विद्युत कार्यालयाच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन करण्यात आले ह्या निवेदनात असे म्हटले आहे की गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी आपले राज्य सदैव तात्पर राहील अशा पद्धतीची ग्वाही देणाऱ्या सरकारला कदाचित विसर पडला असेल की महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा लाखो लोक बेरोजगार आहेत हाताला काम नाही पिण्याला पाणी नाही अशा लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या ऐवजी आपण जर ह्या सर्व लोकांना मातीत घालण्यासाठी स्मार्ट मीटर च्या माध्यमातून यांचा जीवनमान संपवणार असून त्यासाठी हे राज्य चालवायचा आहे का या लाईट मीटरच्या पूर्वी सहाशे रुपये बिल येणाऱ्या व्यक्तीला बारा हजार रुपये बिल येते ज्याला चारशे रुपये पूर्वी बिल येत होतं अशा व्यक्तीला आज आठ हजार रुपये बिल येते ही सर्वसामान्य जनता बिल कसे भरणार आहे म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज म्हसवड विद्युत कार्यालयाला निवेदन दिलेला आहे आणि निवेदना वजा आंदोलनाचा असा इशारा देण्यात आला यावेळी युवक क्रांती दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे जाविर बापू महादेव काटकर असे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
एम एस ई बी या कार्यालयात स्मार्ट मीटर च्या बाबतीत निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी तेथील ग्रामस्थ तसेच युवक क्रांती संघटना राज्य कार्यवाहक श्री राजकुमार डोंबे सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे किशोर भाऊ सोनवणे श्री महादेव काटकर शिवाजी बापू जावीर तसेच विठ्ठल ढगे राजेंद्र दोशी यांचे सुपुत्र तसेच मधुकरराव भोकरे व इतर ग्रामस्थ हजर होते