म्हसवड वार्ताहर
सिध्दनाथ यात्रेपुर्वी यात्रासंदर्भात येणार्या सर्व अडचणी दुर करण्याचे आदेश संबधित सर्व विभागांना देण्यात आले आहेत, यंदाची श्री. सिध्दनाथ यात्रेतील प्रशासनाने केलेल्या नियोजनाची भाविक नेहमीच चर्चा करीत असतात, त्यामुळे म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रेत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची योग्य व ती खबरदारी घेतली जात असुन यंदाची श्रींची यात्रा ही आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त करीत आदर्श यात्रेसाठी म्हसवडकरांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी चा रथोत्सव ये- त्या २ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे, यानिमीत्त शहरात भरणार्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते, यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, तालुका वैद्यकिय लक्ष्मण कोडलकर, पोलिस स्टेशन चे स.पो.नि. सखाराम बिराजदार, रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने, अँड.पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, गणपतराव राजेमाने, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, इंजि. सुनील पोरे, सिध्दनाथ देवस्थान ट्र्स्ट चे पदाधिकारी, डूबल मानकरी व म्हसवडकर नागरीक आदी प्रमुख उपस्थित होते,
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की गतवर्षी सिध्दनाथ यात्रेत भाविकांची व व्यावसायिकांची गैरसोय होवु दिली नाही तशीच अपेक्षा यंदाही मी करीत आहे, येथील यात्रेपासुनच जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरु होत असल्याने म्हसवड यात्रेत प्रशासनाने काय व्यवस्था केली याची चर्चा जिल्हाभर सुरु असते त्यामुळेच म्हसवडची सिध्दनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, याशिवाय यात्रा संदर्भात यापुर्वी माणच्या प्रशासनाने बैठक घेवुन सर्व विभागांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास मात्र संबधीत विभागावर हमखास कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिला.
सदर च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेतला तर प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीत व कर्तव्यात कसुर केल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याची खैर नाही अशी तंबी देत जिल्हाधिकारी डुडी यांनी आपण यात्रेच्या मुख्य दिवशी येथे उपस्थित राहुन यात्रेकरुंना व व्यावसायिकांना भेटुन प्रशासनाने त्यांना मदत केली का हे जाणुन घेणार असल्याचे स्पष्ट केले. यात्रेची मुख्य जबाबदारी ही म्हसवड पालिकेची असल्याने पालिकेने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकार्यांनी घेत यावेळी पालिकेला आणखी काही तात्पुरते कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले, तर आरोग्य विभागाने प्रत्येक १ कि.मी. वर एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची व पालिका इमारतीशेजारी एक तात्पुरते रुग्णालय उभारावे त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम तैनात ठेवावी, पुरेसा औषधसाठी त्याठिकाणी ठेवावा यासह म्हसवड आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात बेड आरक्षित करुन ठेवावेत असे आदेश देत याबाबत जी मदत लागेल ती आपण उपलब्ध करुन देवु असे आश्वासीत केले.
उपस्थीती :-
बीडीओ. दहिवडी, साबां उप अभियंता, सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, एम. एस. सी. बी.चे उपअभियंता आर. बी .डावरे, म्हसवड शहर वीज वितरण कंपनी उपअभियंता, म्हसवड नगरपालिका अभियंता चैतन्य देशमाने, म्हसवड महसूल तलाठी यु. डी. आकडमल म्हसवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त हरिभाऊ गुरव, वैभव गुरव, पत्रकार आदी उपस्थित होते.
श्रींचा रथ हा बायपास रोडवरुन –
यंदा माणगंगा नदीपात्रात पाणी असल्याने श्रींचा रथ मार्ग हा बदलण्यात आला असुन यंदा श्रींचा रथ हा नदीपात्रातुन न जाता तो बाय पास रोड ने जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
बस स्थानक परिसरातील उतार त्रासदायक –
यंदा श्रींचा रथ हा बाय पास रोड ने जाणार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी रथयात्रा नियोजन बैठक संपन्न,
