
म्हसवड प्रतिनिधी
माऊली मोटर्स अँड टायर्स नावाचे दुकानाचे शटर कशाने तरी उचकटून व शटरचे कुलूप कशाने तरी तोडून दुकानातील अपोलो व योकोमा कंपनीचे 27 टायर एकूण किंमत 99,100/- रुपये किमतीचे टायर हे कोणीतरी अज्ञात इसमानी घरफोडी चोरी झाली आहे.संतोष नारायण नरळे यांनी म्हसवड पोलीसात फिर्याद दिली आहे.
म्हसवड ता.माण जि. सातारा गावचे हद्दीतून फिर्यादीचे माऊली मोटर्स अँड टायर्स नावाचे दुकानाचे शटर कशाने तरी उचकटून व शटर चे कुलूप कशाने तरी तोडून दुकानातील सुमारे 99 हजार रुपये किंमतीचे टायरची चोरी केली आहे.
सुमारे 27 टायर चोरले आहेत. म्हसवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपाधिक्षक अश्विनी शेंडगे,एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ एस.एच.वाघमारे अधिक तपास करीत आहेत.