म्हसवड….प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर अहोरात्र दक्ष असणाऱ्या सैनिकासाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांनी पाठवलेल्या राख्या मिळाल्या बद्दल तेथील बटालियनच्या सैनिकांनी आनंद व्यक्त करून त्याबाबतचा संदेश नुकताच शाळेला पाठवला आहे.
रक्षाबंधन हा बहीण भावा मधील ऋणानुबंध व प्रेम दृढ करणारा सण . मात्र देशाच्या सीमेवर माय भूमीची अहोरात्र सेवा करणारा सैनिक आपल्या बहिणी पासून खूप दूर असतो. हाच भावनिक धागा पकडून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व त्यांच्या शिक्षक सहकार्यांनी विद्यार्थ्याकडून बनवलेल्या राख्या मधून निवडक 500 राख्या काश्मीर च्या सीमेवरील लडाख व पहलगाम भागात संरक्षणासाठी तैनात असलेल्या बटालियन मधील सैनिकासाठी पाठवल्या होत्या. सदर राख्या त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शूर जवानांनी त्या राख्या एकमेकाला बांधून आनंद व्यक्त केला व त्याबाबतचा फोटोसह शुभ संदेश शाळेला पाठवला. सदर शुभ संदेश पाहून शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, सर्व शिक्षक यांनी आगळावेगळा, भावनिक व दूरदृष्टीचा उपक्रम राबवल्याबद्दल शाळेतील अनेक पालक प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाचा गौरव केला. या महत्त्वपूर्ण देशभक्तीपर उपक्रमासाठी सातारा सैनिक कल्याण बोर्डाची माजी अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल भानुदास जरे तसेच संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी मार्गदर्शन केले.
सीमेवरील सैनिकाकडून क्रांतिवीर शाळेला रक्षाबंधनाचा कृतज्ञता संदेश.