म्हसवड….प्रतिनिधी
शिवसेना शेतकरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कृषिरत्न प्रा. विश्वंभर यांची नव्याने फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी सेना कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी सेना कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे हस्ते कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांना प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेना पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी सेना कार्यकारणीत महाराष्ट्राच्या विविध भागातील इतर सात पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक , कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे , खासदार नरेश म्हस्के, प्रदेश कार्यालयाचे सचिव संजय मोरे, व राम रेपाळे , सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव , जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, ज्येष्ठ नेते उद्योजक हणमंतराव जगताप,जिल्हा समन्वयक विराज खराडे, यांच्यासह शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेते , तसेच सातारा जिल्हा व माण तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रा. विश्वंभर बाबर यांचे अभिनंदन केले.
शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. विश्वंभर बाबर यांची फेर नियुक्ती.