
सांगली /वांगी . फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र व सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्रातर्फे महात्मा बसवेश्वर (891वी) आणि अहिल्याराणी होळकर(300वी) यांचे जयंतीनिमित्त व आवर्जून आठवण म्हणून समाजसेवक सहदेव धोंडीबा माळी ,मालगाव यांची सत्यशोधिका पूनम माळी (Msc.CS), हिचा वाढदिवस दिन हाच शुभ महुर्थ म्हणून सोमवार दि.26 मे 2025 रोजी दु.12.30वा. कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम माळी ,वांगी यांचे सत्यशोधक विजय माळी (BA) सोबत महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने मोफत होणार आहे.
सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्राचे प्रा.प्रतिमा परदेशी यांचे विनंतीवरून या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पार पडणार आहेत. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुदाम धाडगे व हनुमंत टिळेकर यांनी महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन करणार आहेत. आणि प्रा..पांडुरंग गाडेकर हे भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करणार आहेत. यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात येणार आहे. तर वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
या विवाहप्रसंगी सभामंडपात भारताचे संविधान ,व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात धरून फुलांच्या पायघड्यावरून वधूवर – पूनम,विजय यांचे आगमन होणार असून त्यांचे शुभहस्ते प्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर आईवडील, मामा मामी व इतर मान्यवरांचे हस्ते महात्मा बसवेश्वर,अहिल्याराणी होळकर,शिव,शाहू,आंबेडकर व इतर महापुर्षांचे फोटोना हार अपर्ण करून राष्ट्रीय ग्रंथाचे पूजन केले जाणार आहे.. यावेळी मंचावर धन धान्याचे पूजन आणि विवाहाची आठवण म्हणून फळझाडाचे वृक्षारोपण केले जाणार आहे तर आलेल्या सर्व मान्यवरांना महापुर्षांचे ग्रंथ भेट दिले जाणार आहे व विवाहप्रसंगी अक्षता म्हणून फुलांचे पाकळ्या वापरण्यात येणार आहे अशी माहिती या ऐतहासिक सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजक परशुराम माळी यांनी दिली तर शेतकरी संघटनेचे व सत्यशोधक विद्रोही चळवळीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत असे देखील म्हंटले आहे.