
औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
सातारा जिल्हा हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु खटाव व माण तालुक्या मध्ये गेले अनेक दशकांपासून दुष्काळाचे सावट आहे पाण्याचा जरी दुष्काळ असला तरी या दोन तालुक्यात अधिकारी वर्ग हा जास्त असल्याचे दिसत असतो खटाव तालुक्यातील औंध या गावातील चिरंजीव विशाल उद्धव माने याची आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमधून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये निवड झाली आहे त्याच्या या यशा मुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सर्व स्थरावरून विशाल चे अभिनंदन होत आहे
औंध गावातील प्रमुख मान्यवरांनी विशाल याचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच औंध गावातून तर पंचक्रोशीतून विशाल याचे अभिनंदन होत आहे.विशाल याचे शालेय जीवन हे औंध मधील श्री श्री विद्यालय येथे झाले असून अकरावी बारावी सुद्धा राजा भगवंतराव जुनियर कॉलेज औंध येथेच झाली लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेपूर येथून बीएस्सी ऍग्री ची पदवी घेत त्याने या यशाला गवसणी घातली आहे.