
प्रतिनिधी: विनोद लोहार
वडूज : हुतात्मा नगरी म्हणून परिचित असलेल्या वडूज शहराला धार्मिकतेची परंपरा आहे . तर शहरात विविध कार्याचा वारसा येथील युवा पिढी जोपासत असून प्रत्येक समाजातील दात्यांमुळे धार्मिकतेत भर पडत असल्याचे प्रतिपादन श्री महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार माळी यांनी केले .
येथील महादेव मंदिर पारिसरात स्वर्गीय वनिता विलासचंद शहा यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त पाकगृह व व्यासपीठ लोकार्पण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष विजयकुमार माळी (तात्या)बोलत होते . याप्रसंगी सुकुमार शहा , मनिष शहा,सचिव चंद्रशेखर जाधव, डाँ.संतोष गोडसे , गिरीश शहा , डॉ. कुंडलीक मांडवे ,वचन शहा , रोहित शहा , अँड.कल्पीत शहा , साहिल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती .
याप्रसंगी सुकुमार शहा म्हणाले , समाजात वावरताना आणि जन्म – कर्म भूमित अनेक घटकांच्या सानिध्यात वावरण्याची संधी मिळते. आई – वडिलांनी दिलेल्या संस्काराची पूंजी समाज हितासाठी कार्यरत ठेवणे काळाची गरज आहे . ऋणमुक्ती साठी आणि शहा परिवाराची परपंरा जोपासण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्वपूर्ण आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक वचन शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तर उपस्थितांचे स्वागत व आभार डॉ. संतोष गोडसे यांनी मानले . यावेळी देवीला गोडसे , सिमा बोटे , शितल वाघमारे , जैनुद्दीन मुल्ला ,महेश इगावे , दिनेश शेटे , महादेव गोडसे , राजेंद्र यादव , तुकाराम फडतरे , विनोद लोहार ,बंडा म्हामणे,राजू शेटे , महेश माने ,बाळू कोळी,आदींसह शिवभक्तांची उपस्थिती होती .
शहा परिवाराची दानत आणि दातृत्व …
यापुर्वीही वडूज येथील शहा परिवाराच्या वतीने दुष्काळ आणि सुख – दुःखात अग्रस्थानी राहून दानत आणि दातृत्वाची वंश परंपरा जोपासली आहे . त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
येथील श्री महादेव मंदीर परिसरातील वनिता लिलाचंद शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाकगृह व व्यासपीठ लोकार्पण केल्याप्रकरणी ट्रस्टच्या वतीने सुकुमार शहा व परिवार यांचा सत्कार करताना चंद्रशेखर जाधव.
