औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
सातारा, २८ ऑगस्ट २०२५ – ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन एमएस आरटीसी अकाउंटिंग विभाग, सातारा येथे करण्यात आले. डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला विभागप्रमुख श्री. तेजस नवले यांची उपस्थिती लाभली. कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थी आदित्य कांबळे आणि श्रद्धा कुंभार यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सहभागी कर्मचाऱ्यांना मजबूत पासवर्ड वापरणे, फिशिंग हल्ल्यांपासून सावध राहणे, अद्ययावत सुरक्षा साधने वापरणे यांसारख्या महत्त्वाच्या सायबर सुरक्षिततेच्या बाबी सांगण्यात आल्या.
हा उपक्रम ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानाचा एक भाग असून, सातारा जिल्ह्यातील विविध संस्था व कार्यालयांमध्ये सायबर जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस सावंत (डायरेक्टर) यांनी विशेष पुढाकार घेतला आणि महत्वपूर्ण सहकार्य दिले त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हा उपक्रम प्रभावी पणे पार पडला . कंप्यूटर विभाग प्रमुख डॉ. आर डी कुंभार (एच ओ डी).आणि पी.ए. लोखंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम चालू आहे .