म्हसवड शहरात सौ.सुवर्णा सुनील पोरे यांच्या नावाची चर्चा..

Spread the love

म्हसवड (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व जलनायक जयकुमार गोरे यांच्या कट्टर समर्थक असणाऱ्या इंजिनिअर पोरे यांच्या पत्नी सौ पोरे मसवड शहरातील एक आदर्श महिला व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहेत सतत सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या सौ. सुवर्णा सुनील पोरे या आगामी म्हसवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मुख्य दावेदार मानले जाते आहे.
सतत समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे.
म्हसवड शहरातील आरोग्य, स्वच्छता पाणी पुरवठा इत्यादी समस्या सोडविण्यासाठी सक्षम नगराध्यक्ष ठरतील अशी चर्चा म्हसवड शहरातील गल्ली बोळात सुरू आहे.
आदर्श महिला व्यक्तिमत्व असलेल्या सौ. सुवर्णा सुनील पोरे यांना च ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संधी द्यावी अशी मागणी लोकामधून होत आहे.
स्त्री कधी माता, पत्नी, बहिण म्हणून ओळखली जाते तशी ती देवी, चंडी, तर कधी रणरागिणी म्हणूनही ओळखली जाते. तिची प्रत्येकवेळची ओळख ही वेगळी असते. परिस्थितीनुसार ती हे रुप धारण करत असते, कधी ती समाजसेविका असते. तर कधी दंडाधिकारीही असते.
आज आपण अशाच एका कर्तबगार, धाडसी व समाजसेवेतून लोकसेवा करणाऱ्या रणरागिणीच्या कर्तृत्वाला उजाळा देणार आहोत.
सुवर्णा सुनिल पोरे हे या रणरागिणीचे नाव आहे
सुवर्णा सुनील पोरे माण तालुक्यातील प्रसिद्ध महिला उद्योजिका आहेत.

स्वतः बी एस्सी असल्याने नोकरीच्या मागे न लागता, महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार व येणाऱ्या काळाचा अचूक वेध घेतला, शेती पुरक केलेला व्यवसाय निवडला भारत गैस एजन्सी ते डिलर म्हणून त्यांची गुणवत्तेवर निवड झाली. हा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळून आदर्श गृहिणी व सामाजिक आयडाल म्हणून प्रसिद्ध आहेत.

. दरम्यान, मुलांना उच् शिक्षण दिले आहे मुलगी डॉक्टर, एक मुलगा ऑटोमोबाईल इंजिनिअर तर एक वकील म्हणून नावलौकिक मिळविला त्यांनी संपूर्ण भारतात पर्यटन केलें आहे.
सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग असतो रक्तदान शिबिर,
पाककृती स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर अशी अनेक शिबिरे आयोजित केली आहेत. त्याच बरोबर कोरोना काळात मास्क संनिटायजर, कोरडा शिधा, पेशंटना हा चहा, आर्तनिक अर्क गोळयांचे वाटप केले आहे
रुग्णांना अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अम्बुलन्स ना नफा ना गोटा या तत्वावर सुरू केली आहे या रुग्णवाहिका लोकार्पण ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हीच रणवाहिका नुकत्याच झालेल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा करण्यासाठी दिली होती
शुभम भारत गॅस व जनश्री फाउंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने गरिब कुटुंबीयांना सहकार्य करण्यात येत आहे
सुवर्णि पोरे यांचा आदर्श गावातील महिलांनी देणे गरजेचे आहे. माण तालुक्यातील महिला साठी त्या प्रेरणास्थान बनलेल्या आहेत.

समाजकार्यात हिरीरीने सहभाग…

सुवर्णा पोरे या पती इंजि सुनील पोरे यांच्या समाजकार्यात हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांनी यामाध्यमातून अल्प मोबदल्यात जिल्ह्यातील समाज बंधू भगिनींना अमृतसर घुमान वैष्णोदेवी यात्रा वडवली आहे. तसेच सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्याचबरोबर सातत्याने संक्रांती सारख्या महिलांच्या जिव्हाळ्याचा सण उत्सवांचे आयोजन करून सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना त्या वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत. तसेच उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या हजारो महिलांना आकर्षक वाण देवून आल्पोपहार देत असतात. नेहमीच त्या गोर-गरिबाच्या मदतीला धावून जात आहेत.
आगामी म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून त्या पदाला न्याय देण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत
.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!