
औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे
बँक ऑफ महाराष्ट्र, औंध शाखेतील दफ्तरी श्री अंबादास आरादी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी गेली 38 वर्षे प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावत बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दीर्घ सेवा कार्याची आठवण त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि खातेदारांच्या मनात सदैव राहील.
या निमित्ताने बँकेच्या औंध शाखेत श्री आरादी यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न झाला. यावेळी शाखाधिकारी मा. संदीप कुमार , उपशाखाधिकारी मा. नील शिंदे , कॅशियर संयुक्ता फडतरे , सबस्टाफ दत्ता सादिगले, तसेच पुसेगाव शाखेचे दफ्तरी वाहिद मुल्ला आणि सबस्टाफ गणेश गुरव यांच्यासह सहकाऱ्यांनी त्यांचा सेवापूर्ती सत्कार केला.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी श्री आरादी यांच्या सेवाभावाचे आणि विनम्र स्वभावाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दीर्घ सेवाकाळात त्यांनी सहकाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन, शिस्त आणि समर्पण भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
बँकेच्या शिस्तप्रिय, कामतत्पर आणि ग्राहकाभिमुख कर्मचाऱ्यांमध्ये श्री अंबादास आरादी यांचे नाव कायम आदराने घेतले जाईल.