
(क्रांतिवीर शाळेत मंथन शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर)
म्हसवड… प्रतिनिधी
राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड मधील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले असून या परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
राज्यस्तरावर मंथन शिष्यवृत्ती ही प्राथमिक शाळा स्तरावर विविध वर्गासाठी घेतली जाते. या परीक्षेत क्रांतिवीर शाळेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांनी मिळवलेला गुणानुक्रम, वर्गनिहाय पुढील प्रमाणे .रिद्धी प्रसाद माने इयत्ता दुसरी 140/150 गुण मिळवून *राज्यात सहावा तर जिल्ह्यात प्रथम* क्रमांक मिळविला.
आयुध सोमनाथ धावड इयत्ता पाचवी 280/300 गुण मिळवून *राज्यात दहावा तर जिल्ह्यात पाचवा क्रमांक*.
अथर्व हरिभाऊ माने इयत्ता आठवी केंद्रात प्रथम क्रमांक.
मोहिनी ज्ञानेश्वर राजगे इयत्ता सातवी केंद्रात प्रथम क्रमांक.
सार्थक तात्याबा राजगे इयत्ता तिसरी केंद्रात द्वितीय क्रमांक.
भरत सतीश दीडवाघ इयत्ता सातवी केंद्रात चतुर्थ क्रमांक.
अन्वित संदेश सोळसकर इयत्ता पहिली केंद्रात चतुर्थ क्रमांक.
आयुष अमित राऊत इयत्ता दुसरी केंद्रात सातवा क्रमांक.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, मुख्याध्यापक सौ सुलोचना बाबर, सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.