जागरुकता,संयम,
आधार अन उपचार !
हेच घेतील कर्करोगाचा समाचार !!
आयुष्यात कोणाला कधी आणि कोणत्या प्रकारचा कर्करोग कोणत्या कारणामुळे होईल हे कदापी सांगता येणे शक्य नाही, एखाद्या कुटुंबात कर्करोगाचे निदान झालेला रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांची माणसिक स्थिती घाबरून जास्तच केविलवाणी होते तसे पहाता कर्करोगाबाबत असलेले अनेक गैरसमज व भीती यामुळे त्यांना काय करावे हे सुचत नाही या सर्वा पुढे एकच प्रश्न निर्माण होतो आता करायचं काय या सर्व बाबी विचारात घेता कर्करोगाबाबत असणारे भीतीदायक गैरसमज यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे कर्करोग हा का होतो कशामुळे होतो , कर्करोग हा काही नवीन रोग नाही या रोगाचा सर्वात जुना उल्लेख इ.स. १६०० बी सी इजिप्त मध्ये पहिला कर्करोग रुग्ण आढळून आल्याचे लिखाणात आहे (सौजन्य गुगल).
पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो परंतु प्रत्येक गाठ किंवा अनियंत्रित वाढ ही कर्करोगाचे असतेच असे नाही, परंतु अशा अनियंत्रित वाढीच्या गाठीची तपासणी तात्काळ करणे अत्यंत आवश्यक आहे सदर तात्काळ तपासणी मधील निष्कर्षामुळे वेळीच निदान होऊन उपचार करणे शक्य होते.
सध्या महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे कर्करोग म्हणजे छातीचा आणि गर्भाशय पिशवीचा कर्करोग यासाठी महिलांनी आपल्या शरीरामध्ये होणारा त्रास बदल अंगावर न काढता तात्काळ त्याची तज्ञांकडून तपासणी करून सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात कोणीही आणि कोणतेही दुखणे अंगावर काढणे न परवडणारे आहे, म्हणजे होणारा शारीरिक त्रास यावर तात्काळ उपचार घेतले तर पुढे होणारा मनस्ताप आणि शारीरिक त्रासापासून सुटका होऊ शकते आणि आपण आपल्या परिवारासह आनंदी जीवन जगू शकतो तर कर्करोग हा भयानक रोग वाटतअसला तरीही कर्करोग म्हणजे मरण नव्हे तर जीवन सकारात्मक बनवण्याची संधी आहे असे आपल्या सर्वांनी सकारात्मक मत परिवर्तन करून त्या रोगावर उपाय करणे शक्य आहे.
कोणत्याही प्रकारचे दुखणे/आजार अंगावर न काढता त्यावर तात्काळ उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे प्राथमिक उपचार करून वारंवार तोच तोच त्रास होत असेल तर विविध तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे असे केल्याने कर्करोग प्राथमिक अवस्थेत मिळतो आणि त्यावर तात्काळ उपचार करून आपण त्यामध्ये पूर्ण बरे होऊन मुक्त होऊ शकतो आपण शारीरिक त्रास असतो तेव्हा घाबरतो आणि कर्करोगाच्या तपासण्या करण्याची मानसिकता नसते त्यामुळे आपण तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे वारंवार ताप येणे जीभ गाल ओठावर लाल किंवा पांढरा चट्टा पडणे वारंवार तोंड येणे गळ्यावर काखेत छातीत न दुखणारी गाठ असणे सतत पित्त होणे भूक न लागणे वजन कमी होणे लघवीद्वारे रक्त जाणे सतत जुलाब/बद्धकोष्ठता असणे वारंवार खोकला होणे व दम लागणे ओटी पोटात दुखणे इत्यादी प्रकारच्या लक्षणांकडे कोणीही (स्त्री-पुरुष) दुर्लक्ष न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे लवकर निदान होत नसेल तर दोन-तीन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन सदर त्रासाच्या निदानापर्यंत पोहोचून योग्य उपचार करणे शक्य होते त्यासाठी आपण स्वतः न घाबरता कर्करोगाच्या निदानासाठी चाचण्या करण्यासाठी समर्थता दाखवणे आवश्यक आहे, कर्करोग नसेल तर उत्तमच पण असेल तर तो प्राथमिक अवस्थेत आपणास मिळेल आणि त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल गेल्या शतकामध्ये वैद्यकीय क्षेत्रात चिकित्सा करण्याच्या तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली आहे त्यामुळे पूर्वी न ओळखता येणारे आजार तात्काळ लक्षात येऊ लाग ले आहेत आणि त्यावर खात्रीने उपचार सुद्धा करता येत आहेत. कर्करोगाचे निदान ऐकल्यावर कर्करुग्ण आणि त्याचे नातेवाईक मित्रपरिवार सुन्न होऊन जातात. कर्करोगाच्या लढाईत कर्करुग्ण व त्याचे परिवारास आधाराची गरज असते कर्करुग्णाने व कुटुंबाने जराही धीर सोडू नये या रोगाची व्याप्ती व त्याचा प्रकार डॉक्टरांशी बोलून माहिती करून घ्यावा या सुरुवातीच्या काळात आपली मनस्थिती अस्थिर असल्याने डॉक्टर काय सांगत आहेत ते आपल्याला कळत नाही व डॉक्टर काय म्हणाले ते आठवत नाही आपल्याला डॉक्टरांना काय विचारायचे ते लक्षात राहत नाही म्हणून आपल्या शंका व प्रश्न डॉक्टरांकडे जाताना कागदावर लिहून घेऊन जाणे म्हणजे डॉक्टरांबरोबर विस्तृत चर्चा केल्याने सर्व शंकांचे निरसन होऊन मनातील प्रश्न सुटतील आणि आपल्याला त्याबाबत सर्व माहिती व्यवस्थित मिळेल त्यामुळे आपले मनोधैर्य वाढेल संकटे कोणावर येऊ शकतात पण त्यांना कसे सामोरे जाता यावर तुम्ही माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहात हे ठरते कर्करोग झाला म्हणून स्वतःला दोष किंवा कमीपणासंबंधीचे काहीच कारण नाही कर्करोग हा रुग्णांच्या सकारात्मक विचारांनी कर्करुग्ण रोगाला नक्की हरवू शकतो. कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही व तो एका माणसाकडून दुसऱ्याला सर्दी खोकल्याप्रमाणे सानिध्यात राहून किंवा हवेतून पसरत नाही तेव्हा कर्करुग्णाबरोबर कुठले व्यवहार करताना बिलकुल घाबरण्याची गरज नाही. कर्करोगासारख्या कठीण विषयाबद्दलच्या लिखानामधून एक विचार व्हावा कोणतेही दुखणे घेऊन,आजार अंगावर न काढणे म्हणजे आपल्या शरीरावर लक्ष ठेवणे त्यामुळे आपण कर्करोगापासून लांब राहू शकतो आणि आपल्या शरिराप्रति आरोग्य विषयक जागरुकता असणे आवश्यक आहे कर्करोग झालाच तर संयम ठेऊन त्यास समोर जाने आणि योग्य उपचारासाठी माहिती घेणे शेवटी एकच “कर्करोग झाला म्हणून रडायचे नाही तर लढायचे ”
आयुष्यात आपल्याला अनुभवाचा फायदा जर कुणाला होत असेल तर यासारखा दुसरा आनंद नाही.माझ्या आईला सन २०१० साली तोंडाचा कर्करोग उद्भवला कर्करोगाचे निदान झालेपासून १० व्या दिवशी तिचे ऑपरेशन झाले त्यावर्षीपासून मी कर्करुग्णासाठी जनजागृती, निदान आणि उपचार शिबीर, औषध उपचारासाठी मार्गदर्शन सेवावृतीने आजतागायत इ. काम सेवावृतीने आजतागायत करत आहे, सदर रुग्णसेवेचे काम मोठ्या प्रमाणात करणेसाठी आम्ही आता “सर्वज्ञ सेवा संस्थेची” स्थापना केली असून आपल्या सर्वज्ञ सेवा संस्थेस श्री नितीनकुमार शेडे व शेडे परिवार वडूज यांनी मु पो -सातेवाडी , ता. खटाव , जि सातारा येथील गट न २१७ क्षेत्र एक एकर विनामोबदला दान दिली आहे सदर जागेमध्ये ११५०० चौ फुट क्षेत्राचे कर्करोग निदान,उपचार केंद्र (Ayurvedic , Allopathy and Palliative care centre & old age home ) व वृद्धाश्रम आपण सर्व मिळून उभा करवयाचे आहे सदर कामासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद सहकार्य, सदिच्छ्या सोबत आहेतच म्हणून आवश्यक त्या सर्व शासकीय मंजुरी यापूर्वीच मिळाल्या आहेत लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरवात करीत आहोत.
“ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ” संस्थचे ब्रीदवाक्य असून कर्करुग्णाच्या मदतकार्यासाठी इंजि श्री नितीनकुमार तिवाटणे संस्थापक अध्यक्ष सर्वज्ञ सेवा संस्था म्हसवड , ता माण, जि सातारा. कर्करोग संबधी माहिती साठी संपर्क संपर्क भ्रमनदूरध्वनी क्र ९४०३८१५१०५, ९०११४७६६००

