- मायणी वार्ताहर
आज मायणी परिसर पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृत्तपत्रात 105 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मूकनायक या स्वातंत्र्यलढ्यात समाजभान राखणाऱ्या लेखणीच्या खजिन्याचा विस्तृत स्वरूप देणाऱ्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी दुग्धशर्करा योग म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेच्या नोटरी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल अँड. तुकाराम माळी यांचा व खटाव तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मायणी गावचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील प्रशांत कोळी पाटील यांचा मायणी परिसर पत्रकार संघाच्या वतीने यादिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी मायणी परिसर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता कोळी, उपाध्यक्ष अंकुश चव्हाण सर कार्याध्यक्ष संदीप कुंभार, मार्गदर्शक बाळासाहेब कांबळे सर,सदस्य सतीश डोंगरे , संघटक विशाल चव्हाण, सचिव मंगेश भिसे , सुनील शिखरे सर आदी उपस्थित होते.

