ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणा-यास वडूज पोलीसांकडुन अटक.
दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पोना/१७८५ प्रविण सानप व पोकॉ/८७६ अजित काळेल यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, एक मुलगा चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरीता ग्राहक शोधत आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्याने त्यांनी ती माहीती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना सांगितली असता त्यांनी मायणी पोलीस स्टापला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केल्याने पोकॉ/१२२४ प्रदिप भोसले याचा पेहराव बदलून त्यास मध्यस्थामार्फत मोटारसायकल खरेदी करायची आहे. असे गोपनीय बातमीतील संशयीत दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचीतही संशय न येऊ देता संपर्क साधला असता मोटारसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरवातीला त्याचे ताब्यातील मोटारसायकल विक्री करण्याकरीता मायणी येथे बोलावले. त्यानंतर बनपुरी येथे बोलावले व त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलावले. त्यानंतर दिनांक ३१/०१/२०२५ संशयीत मुलगा धोंडेवाडी गावी १२.३० वा चे सुमारास एक मोटारसायकल स्प्लेंडर कंपनीची विक्रीसाठी घेऊन आला. बनावट ग्राहक पोकॉ/१२२४ प्रदिप भोसले व संशयीत मुलगा यांची बोलणे सूरू होताच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायणी पोलीस स्टापने त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयीत मुलाने त्यांचे नाव शुभम राजू निकम वय २० वर्षे रा. माहुली ता. खानापूर जि. सांगली असे असल्याचे सांगून त्याने सदरची मोटारसायकल ही दिनांक ३०/०१/२०२५ रोजीचे रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांचे घरासमोरून चोरून आणले असल्याचे सांगितले. यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळी करता पोलीस ठाणे वडूज गुन्हा रजि नं ३८/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मोटारसायकलचे वर्णन मोसा क्र. एम.एच.११ सी.एन ५३२२ स्प्लेंडर मोटर याप्रमाणे आहे. विक्रीसाठी आणलेली मोटारसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास काल रोजी अटक केली आहे.
त्यानंतर त्याला विश्वासात घेवन अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने दुसरी एक मोटारसायकल क्र. एम.एन.११ सी.पी. ०४५७ ही सातारा येथुन चोरल्याचे सांगितलेने त्याच्याकडून सदर दोन मोटारसाकली असा एकूण १,१५,०००/- रू चा माल हस्तगत केला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवा. ५६७/कारंडे हे करीत आहेत.
सदर आरोपी यांस विश्वासात घेऊन तू चोरी का करतो असे विचाले असता सदर आरोपी याने सांगितले की, मी ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटारसायकल चोरी केली आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम सोनवणे, सपोनि विक्रांत पाटील, पोउ पनिरीक्षक कदम, पो. हवा नानासाहेब कारंडे, शशीकांत काळे, आनंदा गंबरे, अमोल चव्हाण, पो.ना.प्रविण सानप, पो.कॉ. बापू शिंदे, प्रदिप भोसले, संदीप खाडे व अजित काळेल व प्रियंका सजगणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. नानासाहेब कारंडे हे करीत आहेत.