म्हसवड वार्ताहर
माण तालुका व परिसरातील भारत गॅस ग्राहकांसाठी शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड तर्फे महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी इ-के.वाय.सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप इ-के.वाय.सी केलेले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एजन्सीकडून अधिकृत गाडीच्या माध्यमातून देखील इ-के.वाय.सी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट म्हसवड येथील मुख्य कार्यालयात येण्याची सक्ती राहणार नाही.
इ-के.वाय.सी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
गॅस पुस्तक
स्वतः ग्राहकाची उपस्थिती
सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह इ-के.वाय.सी पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड तर्फे करण्यात आले आहे.