म्हसवड,ता.19: वार्ताहर –
म्हसवड,ता.19: येथील येथील नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांनी पालिकेत प्रसिद्ध केली. निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा नकाशा नागरिकांसाठी खुला केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. 20 जागांसाठी 10 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. सर्व 10 प्रभाग द्विसदस्यी त्रिसदस्यीय असणार आहे. या रचनेमुळे अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांच्या पारंपरिक प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत, ज्यामुळे अनेकांवर सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ येणार आहे. आरक्षणासह राखून ठेवावयाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला सदस्य संख्या यांचेसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगपालिका क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 चे कलम 74 चे पोट-कलम 2 व 3 च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना प्रदान केले आहेत.निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे यानुसार म्हसवड नगरपालिकेची लोकसंख्या 2011 मधील जनगणने नुसार 24120 इतकी असून एकूण निवडून द्यायची सदस्य संख्या 20 आहे.पैकी अनुसूचित जातीचे 3 सदस्य असणार आहेत. अनुसूचित जमातीचा एकही सदस्य असणार नाही.तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे 5 सदस्य असणार असून सर्वसाधारण प्रवर्गातील 12 सदस्य असणार आहेत. अनुसूचित जातीच्या 3 सदस्यांपैकी 2 सदस्य महिलांसाठी राखीव असणार आहेत.तर सर्वसाधारण प्रवर्गातील 12 सदस्यांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
महिला सदस्यांसाठी एकूण सदस्यांपैकी 50 टक्के म्हणजे 10 सदस्य असणार आहेत. पैकी 2 सदस्य अनुसूचित जातीचे असणार आहेत तर 3 सदस्य नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे असणार आहेत.व उर्वरित 5 महिला सदस्य या सर्वसाधारण प्रवर्गातील असणार असल्याचे डॉ.माने यांनी सांगितले.
पालिकेच्या प्रत्येक प्रभाग रचना व त्यामध्ये समाविष्ट केलेला परिसर व कंसातील लोकसंख्या पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 ( 2533)
परिसर –
भाटकी हद्द, शेटे वस्ती, कोडलकर वस्ती, कारंडे वस्ती,शेटे वस्ती, कोडलकर वस्ती, पोलीस ठाणे परिसर, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उद्यमनगर एक, पिसे, झपाटे वस्ती, लांब वस्ती, कारंडे वस्ती.
दक्षिण दिशेतील
चोपडे वस्ती, सातारा-पंढरपूर रोड, सिद्धनाथ हायस्कूल, रामोशी गल्ली, शेरी
पश्चिम दिशेतील चोपडे वस्ती, सूर्यवंशी वस्ती, शिक्षक हाउसिंग सोसायटी व खांडेकर वस्ती
प्रभाग क्रमांक 2 (2365)
परिसर-
ऊत्तर दिशेतील कारखेल हद्द
मासाळवाडी तलाव परिसर, मासाळवाडी, लोखंडेवस्ती, ढोकमोडा, बोंबाळे वस्ती, मानेवाडी, राउतवाडी
पूर्व दिशेतील धुळदेव ओढा, ढोकमोड ओढा दक्षिण दिशेतील
माणगंगा नदी पश्चिम दिशेतील
म्हसवड-माळशिरस रस्ता, भांदुर्गे, कलढोणे वस्ती.
प्रभाग क्रमांक 3 ( 2449)
परिसर-
उत्तर दिशेतील सातारा- पंढरपूर रस्ता, उद्यमनगर 1
भांदुर्गे, कलढोणे वस्ती, नारायण सरतापे वस्ती, कोलेवस्ती नजीकचा गाडी रस्ता, शेरी, बेघर वस्ती, हिंगणी रस्ता, माळावरील मातंग वसाहत, वाक वस्ती, खरामळा, पुर्व दिशेतील राउतवाडी,दक्षिण Monster
माणगंगा नदी पश्चिम दिशेतील
गावातील हरीजन वस्ती, उद्यमनगर 2
प्रभाग क्रमांक 4 ( 2308)
परिसर-
मणेर बोळ, नेहरू पथ,भंडारे बोळ, मोमीन गल्ली,चांभार गल्ली,लोटके वस्ती, यात्रा पटांगण रोड, यात्रा मैदान परिसर, काझी मळा, गावातील हरिजन वस्ती, उद्यमनगर २
शेरी, माळावरील मातंग वसाहत, खरामळा पश्चिम दिशेतील
सुतार गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसर, कोळी गल्ली, माळीगल्ली बायपास रस्ता.
प्रभाग क्रमांक -4 ( 2308)
परिसर-
सातारा- पंढरपूर रस्ता
मणेर बोळ, नेहरू पथ, भंडारे बोळ, मोमीन गल्ली, चांभार गल्ली, लोटके वस्ती, यात्रा पटांगण रोड, यात्रा मैदान परिसर, काझी मळा, गावातील हरिजन वस्ती, उद्यमनगर २
शेरी, माळावरील मातंग वसाहत, खरामळा,सुतार गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसर, कोळी गल्ली, माळीगल्ली बायपास रसबोळ,.
प्रभाग क्रमांक -5 ( 2251 ) परिसर-
सातारा-पंढरपूर रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र,रामोशी गल्ली, जनावरांचा दवाखाना माळी बोळ, खटीक बोळ, कथले, तिवाटणे, जैन मंदिर, गोपी कॉर्नर, सिद्धनाथ पथ, चौंडेश्वरी मंदिर, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, म्हेत्रे वाडा, माळी गल्ली, केवटे आणी पिंजारी परिसर पुर्व दिशेतीलमाळी गल्ली बायपास रस्ता, गावातील हरिजन वस्ती, काझी मळा दक्षिण दिशेतील मणेर बोळ,पश्चिम दिशेतील मेन पेठ रस्ता, मासाळटेक, त्रिगुणे बोळ, सणगर गल्ली, राजवाडा परिसर
प्रभाग क्रमांक 6 (2688)
परिसर-
सिद्धनाथ हायस्कूल परिसर, मासाळटेक, त्रिगुणे बोळ, महात्मा गांधी पथ, मोडासे हॉस्पिटल ते कासार बोळ पश्चिमेकडील परिसर, राजवाडा, नाभिक गल्ली, सुतार गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसर, गुरव गल्ली, कोळी गल्ली
पुर्व दिशेतील
मेन पेठ रस्ता, सिद्धनाथ पथ, चांभार गल्ली,दक्षिण दिशेत माण नदी पात्र,पश्चिम दिशेतील
श्री राम मंदिर परिसर, जुने पोस्ट, कासारबोळ, सणगर गल्ली, उत्तर दिशेतील
सातारा- पंढरपूर रस्ता
प्रभाग क्रमांक 7 (2408)
परिसर –
उत्तर दिशेतील खांडेकर वस्ती, काळापट्टा पुर्व दिशेतील शेटे वस्ती, प्राथमिक शाळा, सिद्धनाथ हायस्कूल, सासणे बोळ
हाउसिंग सोसायटी, सूर्यवंशी वस्ती, चोपडे वस्ती, एस टी स्टैंड, कैकाडी गल्ली, सणगर गल्ली, जुनी नगरपरिषद इमारत, श्रीराम मंदिर परिसर, बाजार पटांगण, विठ्ठल मंदिर, जुने पोस्ट, कासार बोळ ,दक्षिण दिशेतील
नाभिक गल्ली, माणगंगा नदी
पश्चिम दिशेतील तावसे वस्ती, एस टी स्टँड ते स्थगृह रस्ता.
प्रभाग क्रमांक -8 (2438)
परिसर-
उत्तर दिशेतील खडकी हद्द
शेंबडे वस्ती, खांडेकर वस्ती, काळापट्टा, तावसे वस्ती, डोवे नाला, महादेव मळा, शिंदे वस्ती, पवार वस्ती, पंत वस्ती, विरकरमळवी, रेस्ट हाउस परिसर, पोस्ट ऑफिस परिसर
पुर्व दिशेतील हाउसिंग सोसायटी, सूर्यवंशी वस्ती, एस टी स्टेंड ते स्थगृह रस्ता. दक्षिण दिशेतील
बोनेवाडी परिसर, म्हसवड मायणी रस्ता,पश्चिम दिशेतील
वरकुटे हद्द, वाकी हद्द, दिवड हद्द
प्रभाग क्रमांक 9 (2286)
परिसर-
उत्तर दिशेतील
पंत वस्ती, विरकर मळवी
पुर्व दिशेतील माणगंगा नदी, म्हसवड ते विरकरवाडी रस्ता
बोनेवाडी परिसर, मसाईवाडी परिसर, नागोबा मंदिर, कबीर वस्ती, भोरे वस्ती, गुरव वस्ती, दहिवडे मळा, बिरोबा मंदिर, झगडे वस्ती, केवटे वस्ती, मेगासिटी, बनगरवाडी
दक्षिण दिशेतील
पानवन हद्द, गंगोती हद्द, पुळकोटी हद्द,पश्चिम दिशेतील
दिवड हद्द पर्यंत.
प्रभाग क्रमांक 9 (2286)
परिसर
उत्तर दिशेतील
पंत वस्ती, विरकर मळवी
पुर्व दिशेतील माणगंगा नदी, म्हसवड ते विरकरवाडी रस्ता
बोनेवाडी परिसर, मसाईवाडी परिसर, नागोबा मंदिर, कबीर वस्ती, भोरे वस्ती, गुरव वस्ती, दहिवडे मळा, बिरोबा मंदिर, झगडे वस्ती, केवटे वस्ती, मेगासिटी, बनगरवाडी
दक्षिण दिशेतील
पानवन हद्द, गंगोती हद्द, पुळकोटी हद्द,पश्चिम दिशेतील
दिवड हद्द पर्यंत.
प्रभाग क्रमांक 10 (2489) निव
परिसर-
ऊत्तर दिशेतील माण नदी पात्रालगतची खासबाग वस्ती, राखुंडे वस्ती,जठरे वस्ती, शिंदे वस्ती, बेघर वसाहत,खोत गल्ली, ढम गल्ली, विरकरवाडी सोकासणे गल्ली पुर्व दिशेत देवापुर हद्द व पश्चिम दिशेस म्हसवड-विरकरवाडी रस्ता, बनगरवाडी.