म्हसवड दि.२६
मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी म्हसवड मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी शेंबडे कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांना प्रत्यक्ष २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
शेतकरी बांधवांना अपघाती मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास शासनाने आर्थिक आधार म्हणून ही योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत शेंबडे कुटुंबियांना आर्थिक मदत मंजूर झाली होती.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच अडचणीच्या प्रसंगी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री. वैभव लिंगे, मंडळ कृषी अधिकारी श्री गजानन खाडे, उप कृषी अधिकारी हरिभाऊ वेदपाठक व कृषी विभागातील अन्य अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
फोटो –
