म्हसवड:- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता १२ वी परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखा म्हसवड चा १००% निकाल लागला असून सानिका पिंगळे हिने ८३.८३ टक्केगुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत इयत्ता 12वी विज्ञान शाखा परीक्षेचा निकाल १००% लागला.या कॉलेज मधील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक पिंगळे सानिका राजेंद्र 83.83%, द्वितीय क्रमांक -स्वरांजली संतोष वेदपाठक 79.67 % , त्रितीय क्रमांक- प्रांजल उज्ज्वलकुमार काळे 77.50%, गुण संपादन करून उज्वल यश मिळविले. क्रॉप सायन्स या विषयात २०० गुणांपैकी मिळविलेले प्रथम तीन विद्यार्थी.. प्रथम- सिद मानसी सुहास 198 गुण ,
द्वितीय – गायकवाड नम्रता दत्तात्रय 196 गुण,
तृतीय – धनवडे तृप्ती नामदेव 195 गुण,
तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात 100 पैकी प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे..
प्रथम – पिंगळे सानिका राजेंद्र 98गुण,
व्दितीय – काटकर प्राची भरत 95 गुण,
तृतीय – गोंजारी यशश्री अनिल 94गुण
तृतीय – गायकवाड अभय धनाजी 94 गुण मिळविले.

ज्युनियर कॉलेजमधील सर्व गुणवंत विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , प्राचार्य विठ्ठल लवटे व सर्व मार्गदर्शक प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.