पंढरपूर वार्ताहर –

समस्त हिंदू खाटीक समाज पंढरपूर शहर अध्यक्ष मा श्री कालिदास शरद जवारे यांच्या संकल्पनेतून भव्य सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळी जेजुरी मार्तंडे देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड झालेले श्री मंगेश अशोकराव घोणे यांचा सत्कार माननीय श्री आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर माननीय श्री समाधान दादा अवताडे यांचा सत्कार हिंदू खाटीक समाज शहर अध्यक्ष कालिदास जवारे यांच्या हस्ते पंढरपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय विश्वजीत घोडके साहेब यांचा सत्कार श्री राहुल आनंद कोथमीरे व नंदकुमार त्रिंबक ताडे शिवसेना शिंदे गट श्रीगोंदा तालुका अध्यक्ष यांचा सत्कार श्री रामचंद्र अंबादास खडके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समाजातील बाल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी समाज बंधु श्री महेश इंगोले श्री महेश खडके श्री अंबादास बेंद्रे श्री कैलास गालींदे श्री नितीन कांबळे सर श्री राजाभाऊ अरुण ताटे श्री बाबा जनार्दन जवारे श्री भीमाशंकर कातवटे श्री सुनील खडके श्री नंदकुमार शिरसागर श्री पिंटू कलाल श्री विशाल जवारे श्री अतुल जवारे श्री नितीन खडके प्रज्वल खडके व शेकडो समाज बांधव उपस्थित होते