म्हसवड (वार्ताहर):-
तु माझी बदनामी करतो ,असे बोलून एकास मारहाण केली असा गुन्हा म्हसवड पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी.
म्हसवड येथील भगवान गल्ली या परिसरात राहणारे फारुख हिदायतुल्ला काझी राहणार. म्हसवड हे स्वताचे घरा चे समोरुन चालत जाताना यात गल्लीमध्ये राहणारे दाऊद अब्दुल रज्जाक मुल्ला, व समिर काबील मुल्ला दोन्ही रा. म्हसवड (भगवानगल्ली) ता. माण जि. सातारा मोटार सायकल वरून आले त्यांनी फारुख काझी यांना तु आमची बदनामी करतोस असं म्हणून मारायला सुरुवात केली, यावेळी समीर याने फारुख यास पाठी मागुन पकडले. तर दाऊद मुल्ला याने लोखंडी फायटर ने फारुख काझी यांच्या नाकावर मारले. यामुळे नाकातून रक्त स्राव झाला.
अशी फिर्याद म्हसवड पोलीसात फारुख काझी यांनी दिली आहे.
यानुसार अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन एन पळे हे करत आहेत.
…
म्हसवड येथे मारामारी

Leave a Reply