म्हसवड वार्ताहर *–

मासाळवाडी म्हसवड येथे तलाठी कार्यालय व रस्त्याचे भूमिपूजन
मासाळवाडी म्हसवड येथे तलाठी सजा वेगळा करण्यात आला असून त्या सजाचे कामकाज मासाळवाडी कार्यालयातून सुरू झाले पाहिजे त्यासाठी मंत्री महोदय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांनी तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले होते. आज प्रत्यक्षात मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेल्या तलाठी कार्यालय चे भूमिपूजन तलाठी कार्यालय संघटनेचे अध्यक्ष व जयकुमार गोरे भाऊ यांचे शासकिय स्वीय सहाय्यक श्री गुलाब उगालमोगले, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी भाऊ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, म्हसवड सजाचे तलाठी अधिकारी, म्हसवड नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष व मासाळवाडीचे सुपुत्र ज्यांनी आपल्या गावात तलाठी कार्यालय व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले व भाऊंचे विश्वासू कार्यकर्ते डॉ वसंत मासाळ , माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ, श्री सुखदेव मासाळ, शिवाजी मासाळ, ॲड देविदास मासाळ तसेच बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ व वहिनी साहेब यांचेवर मासाळवाडी म्हसवड मधील नागरिकांचे प्रचंड प्रेम, आस्था, आपल्या हृदयातील हक्काचा माणूस म्हणून वेगळेच स्थान आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मासाळवाडीतील नागरिकांनी भाऊंना विक्रमी ७०० मतांचे फक्त मासाळवाडी मधुन मताधिक्य दिले होते. त्याचीच परतफेड म्हणून भाऊंनीही मासाळवाडीतील नागरिकांवर विकासकामांच्या माध्यमातून मदत केली. आज तलाठी कार्यालय व रस्त्याचे डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच मासाळवाडी म्हसवड मुख्य रस्त्याचे डांबरीकरण होणार असून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जीहेकठापूर योजनेचे पाणी मासाळवाडी च्या तलावात सोडले जाईल अशी आशा आहे.