
लोणंद – प्रतिनिधी
व्याख्यानमाला काळजी गरज झाली असुन लोणंद सारख्या ग्रामीण भागात ‘खेमातीर’ व्याख्यानमाला सुरू करण्याचा मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे,
सातारा जिल्हयात लोणंदची एक वेगळी सास्कृतिक ओळख असुन खेमातीर व्याख्यानमालेमुळे लोणंदची नवी ओळख निर्माण होईल, व्याख्याता ज्या विषयावर बोलतो ते संस्कार समाज मनावर होत असतात,सोशल मिडीयामुळे तरुण पिढी भरकटत चालली असुन आजची पिढी शिक्षत होण्याबरोबरच सुस्कारित होणे गरजेचे आहे, चांगले विचार ऐकणे काळाची गरज असुन खेमातीर व्याख्यानमालेतुन चांगले प्रबोधन होईल, या व्याख्यानमालेचे व्यासपीठ राजकारण विरहीत ठेवा, या कार्यक्रमामध्ये कसलेही राजकारण आणु नका,लोणंदची खेमातीर व्याख्यानमाला राज्यात नावारुपास येईल असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी केले.
लोणंद येथील खेमावती नदीच्या काठावर बाजारतळ येथे मा. मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कथाकार प्रा रविंद्र कोकरे यांचे माती नाती व संस्कृती या विषयावर पहिले व्याख्यान झाले,या व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी नामदार मकरंद पाटील बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे,उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी,टिंबर असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिठूभाई पटेल आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना नामदार मकरंद पाटील म्हणाले लोणंद शहराचा झपाटयाने विकास होत असुन या विकासाबरोबरच वैचारिक व पर्यावरणपुरक विकास झाला पाहिजे,लोणंदच्या खेमावती नदीच्या नावाने मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानने ही खेमातीर व्याख्यानमाला सुरु केली असुन या प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमामध्ये मी सहकार्य करणार आहे.
यावेळी बोलताना प्रा रविंद्र कोकरे म्हणाले खेमातीर व्याख्यानमालेचा सास्कृतिक उत्सव जिल्हयात नावलौकिक मिळवेल,नाती व संस्कृती सोडल्यामुळेच घराघराची माती झाली असुन मुलानी आई बापाचे नाव जपले पाहिजे,
माणसाच्या आयुष्याचे सोने होण्यासाठी संगत व पंगत चांगली असणे गरजेचे आहे,माणसं शरीराने वाढली असुन घरातील संवाद बंद झाला आहे, त्यामुळे घरात जिजाऊ, अहिल्या, सावित्री जन्मला पाहिजेत तरच आपली घरे वाचणार आहेत,
माणसाचे हसणे बंद झाले असुन प्रत्येक अडचणीला हसत हसत सामोरे जाणे म्हणजे जीवन जगणे होय,जास्त कमवण्याच्या नादात जवळ आहे ते गमवु नका संपत्ती कमी कमवा मात्र संतती अशी कमवा की अत्यल्प संपत्ती देखील आयुष्यभर पुरेल.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक सागर शेळके
यांनी केले, सुत्रसंचालन मराठा पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अनिलराजे निंबाळकर व प्रतिष्ठानचे सचिव ॲड. गजेंद्र मुसळे यांनी केले, पाहुण्याचा परिचय पत्रकार शशिकांत जाधव यांनी केला,आभार पत्रकार ज्ञानेश्वर ससाणे यांनी मानले,
यावेळी मनोज पवार,माहिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुचेता हाडंबर,शंकरराव क्षीरसागर,लक्ष्मण शेळके, सुभाष घाडगे, शिवाजीराव शेळके,भरत शेळके,सचिन शेळके,तृप्ती घाडगे, निलेश शेळके, संदीप शेळके, श्यामसुंदर डोईफोडे दयानंद खरात,एन डी क्षीरसागर, बबन शेळके, बबलु इनामदार, राहुल घाडगे, राजेश शिंदे, डॉ स्वाती शहा, डॉ मनोज निकम, डॉ मकरंद डोबांळे आदी मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे नियोजन
कार्याध्यक्ष रविंद्र क्षीरसागर,उपाध्यक्ष उदयसिंह जगताप,खजिनदार सुनिल शहा,लोणंद बाजार समितीचे सभापती सुनिल शेळके,पत्रकार रमेश धायगुडे यांनी केले.