‘’ आयत्या बिळावर नागोबा
चक्क समाजाची दिशाभूल ‘’

सध्या खोटे बोल पण रेटून बोल अशी नवी चुकीची परंपरा समाजातील कांहीं पुढारी मंडळींनी समाजासमोर मांडली आहे. आपला कुठलाही दूरान्वयाने काहीही संबंध नसताना स्वयंघोषित टिळा लावून नसलेले पदे जोडून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, वर्तमान पत्रात खोट्या बातमी छापून आणणे, समाजाला आणि कांही प्रमुख व्यक्तींना सरळ सरळ ब्लॅकमेल करणे असा छान उद्योग गेल्या कांहीं दिवसांपासून चालू केला आहे.
मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असेल तरीही सर्वांना वस्तुस्थिती कळतेच.
लाखोत नव्हे तर करोडो रुपयांचा हिशोब गेल्या कांहीं वर्षापासून मागूनही ज्यांनी अजून दिला नाही ही मंडळी आता समाजाला अक्कल शिकायला चालले आहेत.
ज्यांनी आपल्या गुरुसमान महाराजांना त्रास दिला त्यांनीच आता महाराजांची ढाल करून किंवा महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळीबार करण्याचे लाजीरवाणी प्रयत्न चालू केले आहेत.
समाजकारण करताना समाजाच्या फायद्यासाठी राजकारण जरूर करावे परंतु राजकारणासाठी समाजाचा गैरवापर करणे हा निंदनीय प्रकार आहे.
केशवराज संस्थेचे आणि नामदेव समाजोन्नती परिषदेचे सर्व पदाधिकारी अत्यंत संयम बाळगून आहेत याचा अर्थ चुकीचा घेऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.
यापुढे सर्व सनदशीर मार्गाने जाण्याची कारवाई करणेस आता मागे आम्ही मागेपुढे पहाणार नाही एवढाच इशारा आज येथे देत आहोत
ही सर्व मंडळी २००४ ते २०२४ पर्यंत कुठे गायब होती. आजच ही मंडळी जागी कशी झाली आहेत हा यक्ष प्रश्न आहे. याचा त्यांनी प्रथमता खुलासा केलेला नाही. तो करावा असे आमचें त्यांना आव्हान आहे असो.
यापूर्वी केशवराज संस्थेच्या उरलेल्या एकमेव एका वरिष्ठ विश्वस्तांना असेच मधाचे बोट लावून बेकायदेशीर मार्गाने स्टॅम्प पेपरवर स्वतः नावे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्याचे कृत्य तसेच.पंढरपूर समाजाला वेठीस धरून,विनाकारण त्रास देऊन काम चालवले आहे हे तेथील समाजाला सुद्धा माहीत आहे.मंदिरातून उपलब्ध होणाऱ्या रोख रक्कमा घेऊन त्याचे काय करण्यात येते हे भगवान विठ्ठल जाणे.
अजून खूप काही याबाबत लिहिण्यासाठी आहे, पण बस सुज्ञास न सांगणे लागे.
गेली चार वर्षे यांनी समाज्याच्या हितासाठी झटण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आमच्या संस्थांना किती त्रास दिला आहे हे मला सांगायची गरज वाटत नाही.
माझ्या आधीचे अध्यक्ष वै. सुधीरदादा पिसे यांना देखील काम करत असताना खूप त्रास दिलेला आहे.
सर्वसामान्य जनतेला हे माहीत आहे की महाराष्ट्र शासन कधीही कोणाच्या हातात पैसे देत नाही, ही वस्तुस्थिती असताना त्याचा निर्रथक बाउ करुन खोटा प्रचार करण्यचा केविलवाणा प्रयत्न केला होता परंतु यात ते तोंडघशी पडलेले आहेत
लोकसहभागातून निधी संकलन करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अत्याधुनिक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर पहिले भव्य असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मारक उभारण्याची कल्पना नामदेव समाजोन्नती परिषदेने शासनासमोर मांडली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे
केशवराज संस्थेचा कायदेशीर अध्यक्ष मी असताना अध्यक्ष म्हणून आपणच आहोत असे मिरवणारे खोटे पद आणि घटनेत सचिव पद असताना सरचिटणीस आपणच आहोत ही बिरुदावली मिरवणारे यांनी कायदेशीर आहोत काय? हे दाखवून द्यावे असे माझे त्यांना आव्हान असून खोटेनाटे पद समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्वांन मंडळींनी आपण कोण आहोत ? याचा त्यांनी आता गंभीरपणे विचार करावाच
४ जिल्हाधिकारी, ४ प्रांताधिकारी, ४ विभागीय आयुक्त, ३ मुख्यमंत्री यांचे बरोबरच विविध खात्यातील सोलापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील अधिकारी यांच्या भेटीगाठी घेतघेत केलेला पाठपुरावा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या २ माजी अध्यक्षांसह आज श्री संजयराव नेवासकर हे करीत आहेत हे आदरणीय नामदास महाराज यांच्या सहित सर्व समाजाला ज्ञात आहे एवढेच आज पुरेसे आहे.
आपला,
बाळासाहेब आंबेकर,
अध्यक्ष,
केशवराज संस्था, पंढरपूर.
जेष्ठ पत्रकार