म्हसवड, ता. 13: येथील ज्येष्ठ नागरिक शिवगंगा अनंतराव शेटे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,दोन विवाहित मुली,सूना,नातसूना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.
विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता. अतिशय कष्टातून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले. प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक सुभाषराव शेटे व प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (कै.) अनिलकुमार शेटे यांच्या त्या मातोश्री होत.
म्हसवड येथील शेटे मळा येथे उद्या (ता. १४) सकाळी आठ वाजता सावडण्याचा विधी होणार आहे.
छायाचित्र
शिवगंगा शेटे