म्हसवड …प्रतिनिधी
माण तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केल्या या स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.
क्रीडा व युवक कल्याण सेवा संचनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुकास्तरीय मुले व मुली हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई म्हसवड येथे करण्यात आले होते. शालेय स्तरीय वय 14, 17 व 19 वयोगटातील एकूण 29 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष एडवोकेट इंद्रजीत बाबर, सातारा जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव ज्ञानेश काळे,माण तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेश बडवे, सातारा जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्रीतम खोत क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, क्रांतिवीर स्कूलचे प्राचार्य विन्सेंट जॉन,तालुक्यातील विविध शाळा हॉलीबॉल टीमचे प्रमुख व क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिवीर चे शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे व त्यांच्या सहकार्याने हॉलीबॉल स्पर्धा शुभारंभाचा कार्यक्रम नेट टिपहॉलीबॉल स्पर्धा शुभारंभाचा कार्यक्रम नेटकेपणे आयोजित केला होता.

