दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
माणदेशातील माण तालुक्यातील वळई व जांभुळणी येथील जागृत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोजलिंग गडास ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे माण खटाव चे कार्यक्षम आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तर माण तालुक्याचे भाजप अध्यक्ष जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हा निर्णय झाला भोजलिंग गड येथे या निर्णयाचे स्वागत आनंदोत्सव साजरा करण्यात आला डोंगर पंचक्रोशीतील सर्वच गावात फटाके व पेढे वाटून मंत्री जयकुमार गोरे भाऊंचे आभार मानण्यात आले व त्यांच्या कार्यभरभराटीची कामना केली.
यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, जवाहर काळेल, माजी सरपंच गजेंद्र काळेल, यशवंत पारशी, सामाजिक कार्यकर्ते दैवत काळेल यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पुजारी मंडळींमध्ये राजाराम काळेल, बाळू काळेल, महादेव काळेल, मुलेश काळेल, बाळू बुवा काळेल, पिंटू काळेल, पिंटू धुमाळ,
सागर धुमाळ, संजय काळेल, सर्जेराव काळेल, वैभव काळेल, भोजलिंग काळेल, प्रल्हाद काळेल यांचा सहभाग होता. महिला व भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी दिलेल्या वचनानुसार देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळवून दिल्याने भोजलिंग गडावर आनंदाचे वातावरण पसरले आहे.
फोटो ओळी भोजलिंग डोंगर येथे आनंदोत्सव साजरा करताना कृषी सभापती शिवाजी शिंदे , जवाहर काळेल, दैवत काळेल व इतर भाविक