(विजय पाठक यांचेकडून )
दहिवडी वार्ताहर
दहिवडी–फलटण या महत्त्वाच्या रस्त्याचे भाग्य अखेर उजळले आहे. अनेक वर्षे रखडलेले आणि खड्ड्यांनी विद्रूप झालेले हे काम आता प्रत्यक्षात उतरणार असून, शासनाने नवीन वर्षाच्या प्रारंभी या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे दहिवडी–फलटण मार्गावरील वाहनधारकांसाठी आता प्रवास ‘सुपरफास्ट’ आणि ‘सुपरसेफ’ होणार आहे. आतापर्यंत या रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून देताच कामाला गती मिळणार आहे.
🔹 १६ मीटर रुंद काँक्रीट रस्ता – प्रवास होणार सुखकर
🔹 वेळ व इंधनाची मोठी बचत – वाहनधारकांसाठी दिलासा
🔹 माण–खटाव तालुक्यातील गावांना जोडणारा महत्वाचा दुवा – विकासाला चालना
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, काँक्रीटीकरण असले तरी या मार्गावर दुभाजक नसेल, अशी माहिती मिळाली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेले हे काम आता मार्गी लागल्याने दहिवडी–फलटण परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
—