मुरूम भागात ढगफुटी; शेती पिकाचे मोठे नुकसान

Spread the love

दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत

(मुरुम प्रतिनिधी सुधीर पंचगल्ले)

मुरूम तसेच परिसरातील आलूर,केसरजवळगा,मुरळी, कोथळी,आचार्य तांडा ,तुगाव याभागात बुधवारी रात्रभर तसेच गुरुवारी व शुक्रवार(11 व 12 सप्टेंबर)रोजी पहाटे ३ ते सकाळी 7वाजे पर्यंत ढगफुटीमुळे हाहाकार माजला होता मोठयाप्रमाणात आलेल्या पावसाने शेतातील सोयाबीन,उडीद,ऊस,तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करावेत अशी मागणी मुरूम तसेच मुरूम ग्रामीण भागातील शेतकऱ्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्यावतीने करण्यात येत असून याबाबत दैनिकाशी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

गणेश अंबर
अध्यक्ष मुरूम मंडळ,भारतीय जनता पार्टी

“अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे,उडीद,सोयाबीन पीक हातातून पूर्णपणे गेले आहे त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करून दिलासा द्यावा”

सुरेश शेळके,
अध्यक्ष- भाजपा कृषी विभाग

“अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे सोबतच शहरी व ग्रामीण भागातील अनेक लोकांचे राहते दगडाच्या घरांच्या भिंतीचे पडझड झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ मदत द्यावी”

रामकृष्ण अंबर
मुरूम शेतकरी

“शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक समस्याला तोंड द्यावा लागणार आहे,पेरणीसाठी झालेला आर्थिक खर्च व त्यासाठी इतरांकडून घेतलेली रक्कम फेडावे कसे याची चिंता आहे म्हणून शासनाने तात्काळ मदत द्यावी”

लिंबणा खुणे,शेतकरी मुरूम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!