मायणी प्रतिनिधी——
स्फूर्ती शिक्षण मंडळाच्या
अनंत
इंग्लिश स्कूल व हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर मायणी शाळेच्या प्रांगणामध्ये 79 वा ध्वजारोहण कार्यक्रम माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगांवकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सकाळी सहा वाजता प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली साडेआठ वाजता माजी ग्रामपंचायत सदस्य विजयरावजी कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांचे कवायत संचालन देशभक्तीपर गीत अशा विविध कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलाकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव येळगावकर होते या कार्यक्रमांमध्ये कार्याध्यक्ष राजाराम कचरे किरण जाधव विजयरावजी कवडे डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर म्हणाले भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांनी अध्ययन करावे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे त्याबरोबरच इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले आणि प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील येलमर सर यांनी केले सूत्रसंचालन श्री बरकत करीम शेख दहावीतील दोन विद्यार्थिनी श्रावणी देशमुखे आणि श्रावणी मदने यांनी केले आभार दीपक खलीपे यांनी मानले