______________
आटपाडी दि . २४ ( प्रतिनिधी )
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी . एम . वाघमारे आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती भीमराव वाघमारे यांच्या मातोश्री जगुबाई महादेव वाघमारे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले . निधनसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या .
पराकोटीच्या गरीब, निरक्षर, अडाणी असणाऱ्या, उपेक्षित, वंचित, मागास समाजातील आणि प्रचंड कष्ट, कुचेष्टा,अवमान सहन करीत राज्यात आदर्श ठरणारी शिल्पे घडविणाऱ्या राजेवाडीच्या माऊली जगुबाई महादेव वाघमारे यांना राजेवाडी पंचक्रोशीत ओळखले जात होते .
राजेवाडीचे
कालकथित महादेव वाघमारे आणि जगुआई वाघमारे या दांम्पत्याने अनेक दशके राजेवाडी पंचक्रोशीत चांगुलपणाने कार्य करत, पाण्यासारखे सर्वांशी मिळून मिसळून वागत, सतत प्रसन्न भावनेने आपला फाटका तुटका प्रपंच कडेवर नेला. भल्या पहाटे उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत राब राबणाऱ्या, या दाम्पत्याने आपल्या लेकरांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला . शेतीसह, शेतमजूरी, आणि पडेल ती कामे करीत शेतकरी, कष्टकरी जीवन सार्थ केले . लई शिका, एक व्हा अन न्यायासाठी लढा या बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणन्यानुसार आपण चाललं पाहिजेल. शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही,असे सतत सांगणाऱ्या या माऊलीने उच्च शिक्षित केलेल्या, तिच्या दोन सुपुत्रांनी मोठ्या पदांवर मजल मारली . श्री . पोपटराव उर्फ पी . एम . वाघमारे हे ज्येष्ट सुपुत्र सार्वजनिक बांधकाम खात्यातून कार्यकारी अभियंता या पदावरून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले . तर दुसरे सुपूत्र श्री . भीमराव वाघमारे यांनी तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदापर्यंत राजकीय मजल मारली . १२ नातवंडे आणि ७ परतवंडात १३ जण पदवीधर असून काही द्वीपदवीधर आहेत. एक नात अमेरिकेत वास्तव्यास आहे.
कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता पती बरोबर श्रमणाऱ्या जगूआई या माऊलीने परिवारातल्या सर्वांच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले . सात्विक वृत्तीच्या जगुआईंनी गावातील मारूती मंदिर, कानीफनाथ मंदिर जिर्णोद्धारासाठी भरीव मदत केली होती. तसेच शैक्षणिक कार्यासाठी मदत करण्यासाठी या कुटुंबीयांचा सदैव हातभार लागत आहे. सर्वसामान्य, कष्टकरी आणि ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येकाला सहकार्य करणाऱ्या या माऊलीने दारी आलेल्या प्रत्येकाला अन्नदान केल्याशिवाय माघारी पाठविले नाही . अत्यंत समाधानी जीवन जगत असलेल्या जगुआईच्या आकस्मीत निधनाने राजेवाडी, लिंगीवरे, हिंगणी, इटकी ,दिघंची या पंचक्रोशीत दुःख व्यक्त होत आहे .
जगूआईंच्या निधनाबद्दल पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा . चेअरमन, संचालक, सदस्य , राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उदयोजक, वरिष्ट अधिकारी, कर्मचारी आणि असंख्य मान्यवर तसेच शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी महोदयां समवेत कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे राज्याचे उपाध्यक्ष, सादिक खाटीक यांनीही जगूआईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली .
