
(अजित जगताप )
कराड दि: संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या कराड तालुक्यातील यशवंत नगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री व सत्ताधारी पॅनल प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने निर्विवाद यश संपादन केले आहे ‘सह्याद्रि’त सत्ताधाऱ्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.…; समर्थकांचा जल्लोष सुरू झालेला आहे. कराड विधानसभेच्या निवडणुकीतील निकालानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना सहकारात मतदारांनी स्वीकारले असून आमदार मनोज घोरपडे यांच्या कामाचे मूल्यमापन करणारा हा निकाल बऱ्याच गोष्टी सांगून गेल्या आहेत.
पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल चार हजारांची आघाडी घेतली. यामध्ये विरोधी आमदार मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे पॅनल दुसऱ्या, तर निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर असल्याने पी. डी. पाटील पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले..
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली.
गट क्रमांक १ : कराड –, गट क्रमांक २ : तळबीड ,गट क्रमांक ३ : उंब्रज –
गट क्रमांक ४ : कोपर्डे हवेली तर४.३९ नंतर वाठार किरोली गटाच्या मतमोजणी सुरू होती.
81 टक्के मतदान व तिरंगी लढत झाल्यामुळे त्याचा फायदा सत्ताधारी पॅनलचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मिळाला आहे. कराड पाटण व सातारा कोरेगाव तालुक्यातील९९ मतदान केंद्रातून मतमोजणी सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलने सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनलचा विजय औपचारिकता बाकी आहे.
या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांची समर्थ साथ माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मिळाल्यामुळे त्यांचा विजय सोप्पा झाला आहे. तर विरोधकांना एकजूट ठेवण्यामध्ये अपयश आले त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना आमदारकीच्या विजय पचवणे अवघड झाल्याचे मानले जात आहे.
सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास दुसऱ्या फेरीतील मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार होता. दरम्यान, अंतिम निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता होती. एकंदरीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलच्या उमेदवारांची सरासरी ४९०० हजारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सर्व ९९ मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु, या निवडणुकीत कमालीची टशन दिसून आल्याने मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.

फोटो -सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटलांची एक हाती सत्ता (छाया- अजित जगताप कराड)