
ग्रामपंचायत कामगार सेनेच्या आंदोलनास यश- जिल्हाध्यक्ष जेके काळे
वडूज प्रतिनिधी . महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद सातारा येथील परिसरामध्ये निदर्शने केली यावेळी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवणे आला होता यामध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यावत नाहीत ,भविष्य निर्वाह निधी ,राहणीमान भत्ता, अद्याप दिला जात नाही तसेच वेळेत वेतन मिळत नाही ,अपघाती विमा नाही ,सेवा पुस्तके अद्यावत नाहीत ,इत्यादी मागण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली .त्यावेळी त्यांनी आपले प्रश्न योग्य असल्याने लवकरच या प्रश्नावर तोडगा काढू असे त्यांनी सांगितले तसेच मा.गटविकास अधिकारी सो यांच्या मार्फत आपले प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले अशा प्रकारचे लेखी स्वरूपात पत्र दिले त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री जेके काळे यांनी प्रसारमाध्यमाला माहिती दिली.
यावेळी कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलासराव कुमार तसेच राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे, कार्याध्यक्ष जनार्दन मुळे ,राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जेके काळे सचिन मोरे सचिव ,गणपत फडतरे खजिनदार ,अमोल सणस, जीवन नांदे, संतोष झणझणे, जावेदभाई पठाण, प्रभाकर नेवसे, रामदास वाघचौडे ,ज्ञानदेव पाटणे ,गोरख मदने ,अमोल काळोखे, भिमाशंकर कोळी ,विद्या निंबाळकर ,बेबी हजारे, मीना कदम, वर्षा जाधव, जयश्री भोसले ,महामुनी मॅडम, शुभांगी येवले, उत्तम गाढवे ,तुषार सणस, उमेश गुरव ,प्रशांत साळुंखे, तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.